पीएमपीच्या विधी अधिकाऱ्यांचे कार्यालय केले सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:54 IST2026-03-29T13:54:04+5:302026-03-29T13:54:30+5:30

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मधील विधी अधिकारी धनेश्वर जाधव यांचे कार्यालय प्रशासनाकडून सील करण्यात आल्याची माहिती ...

PMP legal officer office sealed | पीएमपीच्या विधी अधिकाऱ्यांचे कार्यालय केले सील

पीएमपीच्या विधी अधिकाऱ्यांचे कार्यालय केले सील

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मधील विधी अधिकारी धनेश्वर जाधव यांचे कार्यालय प्रशासनाकडून सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे पीएमपीएमएल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, काही प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियांशी संबंधित अनियमितता तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणात महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यालय सील करण्यात आले असल्याची चर्चा आहे. या कारवाईमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचे कळते.

चौकशीअंती पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पीएमपीएमएलमधील प्रशासनिक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title : अनियमितता जांच के बीच पीएमपीएमएल विधि अधिकारी का कार्यालय सील

Web Summary : पीएमपीएमएल के विधि अधिकारी धनेश्वर जाधव का कार्यालय कथित प्रशासनिक और कानूनी अनियमितताओं के कारण सील कर दिया गया है। महत्वपूर्ण दस्तावेजों को सुरक्षित रखने के लिए कार्रवाई की गई। वरिष्ठ अधिकारियों द्वारा जांच जारी है, जिससे पीएमपीएमएल के प्रशासनिक कामकाज पर सवाल उठ रहे हैं। जांच के बाद आगे की कार्रवाई अपेक्षित है।

Web Title : PMPML Law Officer's Office Sealed Amid Irregularity Probe

Web Summary : The office of PMPML's law officer, Dhaneshwar Jadhav, has been sealed due to alleged administrative and legal irregularities. The action was taken to secure important documents. An inquiry is underway by senior officials, raising questions about PMPML's administrative functioning. Further action is expected following the investigation.