Accident In Pune: भरधाव पीएमपीची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:24 IST2022-06-14T18:24:19+5:302022-06-14T18:24:29+5:30
सहकारनगर पोलिसांनी पीएमपी चालकाला ताब्यात घेतले असून अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात हलविण्यात आले

Accident In Pune: भरधाव पीएमपीची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
धनकवडी : भरधाव पीएमपी बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला हि घटना मंगळवारी दुपारी एक वाजता पद्मावती चौकात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पीएमपी चालकाला ताब्यात घेतले असून अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी स्वारगेट ते पद्मावती दरम्यान दुचाकी वरून जाणारा तरुण पद्मावती चौकातून पद्मावती पंपींग स्टेशनकडे जात असतानाच महाराष्ट्र हौसिंग बाँर्ड ते कात्रज पीएमपी बस कात्रज कडे चालली होती. मात्र दुचाकीस्वाराने अचानक टर्न घेतला ही बाब पीएमपी चालकाच्या लक्षात आली नाही आणि पीएमपीची जोरदार ठोकर दुचाकी स्वाराला बसली. या अपघातात तरुणाच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार बसला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल घेतली आणि पीएमपी चालकाला ताब्यात घेत अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.