PMPML: सातव्या वेतन आयोगासाठी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 12:08 IST2022-08-27T12:07:03+5:302022-08-27T12:08:00+5:30
मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा...

PMPML: सातव्या वेतन आयोगासाठी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी पीएमटी कामगार संघटनेने (इंटक) पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे, ही मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पीएमपीदेखील या दोन्ही संघटनांचा एक भाग आहे. पीएमपीचे १० हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश काढावा, अशी विनंती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. सातवा वेतन आयोग लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, अशा इशारा इंटककडून देण्यात आला आहे.