शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

प्रशासन व सत्ताधा-यांचा वचक नसल्याने पीएमपी बस खिळखिळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 8:00 AM

पुणेकरांच्या सोयीसाठी दर वर्षी या संचलन तुटीपोटी महापालिका दर वर्षी विकास कामांचे कोट्यवधी रुपये पीएमपीएमएला देते.

ठळक मुद्देपीएमपीएमएलच्या भोंगळ कारभारावर विरोधकांचे ताशेरेएका वर्षांत संचलन तुटीत तब्बल ४० कोटींची वाढ

पुणे:  पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भोंगळ कारभारावर मंगळवार (दि.१८) रोजी झालेल्या महापालिकेच्यामुख्य सभेत विरोधकांनी चांगलेच ताशेरे ओढले. गेल्या पाच वर्षांपासून पीएमपीच्या संचनल तुटीमध्ये वाढच होत असून, गत वर्षी संचलन तुटीतमध्ये तब्बल ४० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी दर वर्षी या संचलन तुटीपोटी महापालिका दर वर्षी विकास कामांचे कोट्यवधी रुपये पीएमपीएमएला देते. परंतु ही तुट कमी करण्यासाठी, बस कार्यक्षमपणे चालविण्यासाठी, पुणेकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत. यामध्ये प्रशसनाचा वचक नसल्याने व सत्ताधा-यांकडून दुर्लक्ष होत असल्यानेच पीएमपी बस खिळखिळी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सन २०१८-१९ या वर्षातील संचलन तुटीपोटी मागणी करण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या हिश्शची ६० टक्के रक्कम सन २०१९-२० वर्षात समान हप्त्यात अग्रीम स्वरुपात आदा करण्यासाठी व आता पर्यंत आदा करण्यात आलेल्या ४८ कोटी रुपयांच्या खर्चास पश्चात मान्यता मिळण्यासाठीचा ठराव मंगळवारी मुख्य सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या ठरावावर चर्चा करताना सदस्यांनी पीएपीएमएल प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर जोरदार टिका केली. यामध्ये अविनाश बागवे, प्रशांत जगताप, अरविंद श्ंिदे आणि दिलीप बराटे यांनी वस्तुस्थिती मांडत संचलन तुट वाढण्यास प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून संचलन तुट कमी करण्यासाठी कोणत्याही उपाय-योजना होताना दिसत नाही. पीएमपी डेपोच्या अनेक मोक्याच्या जागा नाममात्र दराने भाडे तत्वावर देण्यात येतात, जाहिरात धोरणाबाबत कोणतेही ठोस निर्णय नाहीत, अधिकारी आॅफीसमध्ये बसून रस्त्यावरील बसचे नियोजन करतात, बेकायदेशीर वाहतुक रोखण्यासाठी कोणत्याही उपाय-योजना केल्या जात नसल्याचे सदस्यांनी सांगितले. तर केंद्रात, राज्यात देखील भाजपचीच सत्ता असून देखील पीएमपी बस खरेदी असो की अन्य प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत देखील विरोधकांनी व्यक्त केली. यावर गेल्या साडे चार वर्षांमध्ये नवीन बस खरेदी करणे व पुणे शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केल्याचे सांगितले.दरम्यान पीएमपीएमएलच्या अनेक बस जुन्या झाल्याने होणारे ब्रेक डाऊन, इंधन खर्चामध्ये झालेली वाढ, कर्मचा-यांचे पगार व इतर गोष्टींवर वाढत असलेला खर्च, बस डेपोसाठी जागा उपलब्ध नसल्याने वाढणारे डेड किलोमिटर आदी विविध कारणांमुळे संचलन तुट वाढत असल्याचे स्पष्टीकरण पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे दिले. तसेच येत्या दोन वर्षांत पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये नव्याने १६४० बस दाखल होणार असून, यामुळे ही तुट कमी होण्यास मदत होणार असल्याचे देखील गुंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे