देहूरोड येथे पीएमपीने दोन दुचाकी, एका मोटारीस ठोकले, तिघे जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:37 IST2018-04-05T14:37:35+5:302018-04-05T14:37:35+5:30
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपूलावरुन निगडीहून वडगाव मावळ येथे निघालेल्या पीएमपी बसने उतार रस्त्यावर मोटार व दोन दुचाकींना ठोकले.

देहूरोड येथे पीएमपीने दोन दुचाकी, एका मोटारीस ठोकले, तिघे जण जखमी
देहूरोड: मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपूलावरुन निगडीहून वडगाव मावळ येथे निघालेल्या पीएमपी बसने उतार रस्त्यावर मोटार व दोन दुचाकींना ठोकले. गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला असून या अपघातात तिघे जण जखमी झाले आहे . जखमींवर देहूरोड व सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातस्थळी मिळालेल्या माहितीनुसार, निगडी ते वडगाव मावळ या मार्गावर धावणारी बस (एमएच. १२ ईक्यू. ३१९०) देहूरोड येथील लोहमार्गाच्या उड्डाणपूलावरुन उताराने जात असताना एका मोटारीस व दोन दुचाकीना ठोकरून बस पूलाच्या कठडयाला धडकली. या बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर देहूरोड बाजारपेठ भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती . महामार्गाच्या दुतर्फा लष्करी भागात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत .