Video : पीएमपी बसचा अपघात,मागून बसची जोरदार धडक, काचा फुटल्या;सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:27 IST2025-07-20T14:25:31+5:302025-07-20T14:27:42+5:30
- सुदैवाने अपघाताच्या वेळी दोन्ही बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काही वेळापूर्वी घडली असून, अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली.

Video : पीएमपी बसचा अपघात,मागून बसची जोरदार धडक, काचा फुटल्या;सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे : शहरातील गणपती माथा परिसरात दोन पीएमपी बसांचा अपघात झाला आहे. वळण घेत असताना एका पीएमपी बसला मागून दुसऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेत एका बसच्या पाठीमागील काचा फुटल्या.
सुदैवाने अपघाताच्या वेळी दोन्ही बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काही वेळापूर्वी घडली असून, अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली.
अपघातानंतर संबंधित बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना दिली असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.