PMC tax collection : पुणे शहरातील मिळकती ४० हजारांनी वाढूनही मिळकतकरात मात्र ३०० कोटींची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:08 IST2026-04-02T11:06:08+5:302026-04-02T11:08:06+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळकतधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकतकराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट झाली आहे.

PMC tax collection Income in Pune city increases by 40,000, but income tax decreases by 300 crores | PMC tax collection : पुणे शहरातील मिळकती ४० हजारांनी वाढूनही मिळकतकरात मात्र ३०० कोटींची घट

PMC tax collection : पुणे शहरातील मिळकती ४० हजारांनी वाढूनही मिळकतकरात मात्र ३०० कोटींची घट

पुणे : पुणे महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ११ लाख ३३ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३० कोटी रुपयांचे मिळकत कराचे उत्पन्न मिळाले आहे. पालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० लाख ९५ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३४६ कोटी रुपयांचे मालमत्ता कराचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळकतधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकतकराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट झाली आहे.

पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाला मार्च २०२६ अखेर संपलेल्या दर ३-४ वर्षांनी येणाऱ्या अभय योजनेमुळे मिळकत कराच्या उत्पन्नाला फटका बसल्याची चर्चा आर्थिक वर्षात ११ लाख ३३ हजार करदात्यांना कडून २ हजार ९८५ कोटी रुपये झाल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. मात्र, यावर्षी राबविलेल्या अभय योजनेतून यातील ९५५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यासाठी पालिकेला ८०० कोटी रुपयांचा दंड माफ करावा लागला आहे. 

अभय योजनेतून मिळालेला थकबाकीदारांचा मालमत्ता कर वगळला तर महापालिकेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात ११ लाख ३३ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३० कोटी रुपये मिळकत कराचे उत्पन्न मिळाले आहे. याउलट महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० लाख ९५ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३४६ कोटी रुपयांचे मिळकत कराचे उत्पन्न मिळाले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षातही महापालिकेला २ हजार २५० कोटी रुपयांचे मालमत्ता कराचे उत्पन्न मिळाले होते. २०२३-२४ पेक्षाही यंदा २०० कोटींनी मिळकत कराचं उत्पन्न घटले आहे. याशिवाय दर ३-४ वर्षांनी अभय योजना येतेच, मग कशाला वेळच्या वेळी कर भरायचा, अशी नागरिकांची वाढलेली मानसिकता हेही कारण असू शकते, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.

Web Title : संपत्ति की संख्या बढ़ने के बावजूद पुणे के संपत्ति कर राजस्व में गिरावट

Web Summary : पुणे में संपत्तियों की संख्या में 40,000 की वृद्धि के बावजूद संपत्ति कर संग्रह ₹300 करोड़ कम हो गया। अभय योजना, एक माफी योजना, ने राजस्व पर प्रभाव डाला क्योंकि ₹800 करोड़ के जुर्माने माफ किए गए। भुगतान में देरी की नागरिक मानसिकता ने भी योगदान दिया।

Web Title : Pune Property Tax Revenue Drops Despite Increase in Property Count

Web Summary : Pune's property tax collection fell by ₹300 crore despite a 40,000 increase in properties. Abhay Yojana, an amnesty scheme, impacted revenue as ₹800 crore in penalties were waived. Citizen mindset of delaying payments also contributed.