शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

PMC ELECTION: पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार? मनसेचं इंजिनही धावण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:59 IST

एक सदस्यीय प्रभाग रचनेनं राजकीय समीकरणं बदलणार; महापालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता

ठळक मुद्देआगामी निवडणुकीत कोण्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता आतातरी धूसर

पुणे : शहरात एक सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पक्षाच्या मतांपेक्षा उमेदवार व त्याचा वैयक्तिक जनसंपर्क अधिक महत्वाचा ठरणार असून, लोकसंख्येच्या आधारावर होणाऱ्या या रचनेमुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचणे हे इच्छुक उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे.      चार सदस्यीय प्रभाग रचना व केंद्र तथा राज्यातील सत्ता यामुळे सन २००१७ मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. परंतु, एक अथवा दोन सदस्यीय प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाल्याचाही इतिहास आहे़ सन २००७ मध्ये एक सदस्यीय प्रभाग असताना व २०१२ मध्ये दोन सदस्यीस प्रभाग असताना राष्ट्रवादी काँग्रेसच बहुमताने विजयी झाले. त्यातच आता नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य लक्षात घेता, एक सदस्यीय प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर ठरणार असे दिसून येत आहे. त्यामुळे या पक्षाला बहुमत मिळाले नाही तरी महापालिकेतील सत्तांतर हे अटळ आहे. सर्वच पक्ष स्वतंत्र लढ्याच्या तयारीत 

आगामी महापालिका निवडणुक महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढतील अशी शक्यता सध्या तरी नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विद्यमान ९ सदस्य कमी होणार की, काँग्रेस पुन्हा शहरात उभारी घेणार हे लवकरच दिसून येईल़ परंतु, या सर्वांमध्ये आता पक्षांच्या मतांपेक्षा वैयक्तिक जनसंपर्क, समाजपयोगी काम, प्रभागातील वर्चस्व या बाबी वरचढ ठरणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना युती झाली तरी, शिवसेनेच्या वाट्याला त्यांची शहरातील ताकद लक्षात घेता फारशा जागा येतील अशी शक्यताही नाही़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात अधिक लक्ष घालून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला असल्याने, मनसेची सदस्य संख्या दोनहून पुन्हा दोन आकडी संख्या पार करणार का हेही महत्वाचे ठरणार आहे.  दरम्यान रिपब्लिक न पक्ष, वंचित आघाडीने स्वतंत्र निवडणुक लढवली तर शहरातील काही भागात त्यांची वोट बँक मोठी असल्याने त्यांचीही संख्या यावेळी निश्चित वाढेल असे चित्र आहे. 

एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता आतातरी धूसर

दोन सदस्यीस अथवा चार सदस्यीय प्रभाग रचनेत पक्षातील एका ताकदवार उमेदवारामुळे अन्य उमेदवारांना फायदा झाल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. पण आता एक सदस्यीय प्रभागामुळे शहरातील सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. सध्या शहरातील तीनही प्रमुख पक्ष आमच्यासाठी ही निवडणुक सोपी असल्याचे सांगत आहेत. परंतु, साधारणत: २० ते २३ हजारांच्या लोकसंख्येच्या प्रभागात किती मतदान तेथील इच्छुक स्वत:कडे वळू शकतात यावर पुढील गणिते अवलंबून राहतील़ यामध्ये पक्षाच्या कामाचाही वाटा असेल पण तो तुलनेने कमीच राहणार आहे. यामुळे आगामी निवडणुकीत कोण्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता आतातरी धूसर वाटत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका