पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. पुरुष मतदारांची संख्या ४४ लाख ९१ हजार ६८, तर महिलांची संख्या ही ४१ लाख ५५ हजार ३३० इतकी आहे. पुण्यात भाजपने आघाडी घेतली असून मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रभाग २५ मधून पहिल्या फेरीत भाजपचे संपूर्ण पॅनल आघाडीवर आहे. तर नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवणारे उमेदवार प्रशांत जगताप हे पिछाडीवर आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे
Web Summary : In Pune's PMC elections, BJP leads in Kasba's ward 25. Congress candidate Prashant Jagtap trails. The election is for 163 seats with a multi-party contest.
Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में, कसबा के वार्ड 25 में भाजपा आगे है। कांग्रेस उम्मीदवार प्रशांत जगताप पीछे चल रहे हैं। चुनाव 163 सीटों के लिए है जिसमे बहुदलीय मुकाबला है।