PM Narendra Modi in Dehu | संत तुकाराम महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी दोन दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 19:09 IST2022-06-11T18:58:37+5:302022-06-11T19:09:03+5:30

श्री संत तुकाराम महाराज संस्थानाची माहिती

PM Narendra Modi visits Dehu Sant Tukaram Maharaj Temple closed for two days for devotees | PM Narendra Modi in Dehu | संत तुकाराम महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी दोन दिवस बंद

PM Narendra Modi in Dehu | संत तुकाराम महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी दोन दिवस बंद

पुणे : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दिनांक 14 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा नियोजित आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 12 जून सकाळी आठ वाजल्यापासून 14 जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. ही माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने देण्यात आलेली आहे.

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील देहूनगरीत शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १४ जूनला होणार आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिर आवार, शिळा मंदिर, सभास्थानी तयारी सुरू आहे. दुपारी एक ते दोन या कालखंडात पंतप्रधान देहूनगरीत येणार असून मंदिरातील सोहळा आणि वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांशी संवाद साधणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा आनंद सोहळा अर्थात आषाढी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे देहूनगरीत चैतन्याचे वातावरण आहे. श्री. श्रेत्र देहूगाव येथील संत तुकाराम महाराज देवस्थानाच्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराशेजारी शिळा मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. या सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी होणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. देवस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्यापही मिनिट टू मिनिट कार्यक्रम जाहिर केला नसला तरी नियोजनानुसार दुपारी एक ते दोन या वेळेत पंतप्रधान देहूनगरीत असणार आहेत.  

असा होईल सोहळा-
१) देहूगाव येथे उभारलेल्या हॅलीपॅडवर पंतप्रधानांचे आगमन होईल. त्यानंतर इंद्रायणीतीरावरील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात  वारकºयांच्या वेशात पंतप्रधान येतील. विठूरायाचे दर्शन घेऊन शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. त्याचवेळी देवस्थानाच्या वतीने तुकोबांची पगडी आणि उपरणे देऊन पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येईल. यावेळी मंदिरात निवडक वारकरी, सेवेकरीही उपस्थित असतील.

२) पंतप्रधानाच्या उपस्थितीतील सोहळ्यासाठी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरील माळवाडी  हद्दीत २२ एकर जागेत बंदिस्त सभागृह तयार केले आहे. त्याठिकाणी चाळीस हजार वारकरी बसतील एवढी क्षमता असणार आहे. तिथे पंतप्रधानाचे आगमन झाल्यानंतर देवस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात येईल. त्यानंतर अध्यक्षांचे मनोगत आणि त्यानंतर पंतप्रधानाचे भाषण होईल. तसेच सोहळ्यास उपस्थित असणाºया वारकऱ्यांशीही ते वारीच्या अनुषंगाने संवाद साधणार आहेत.

Web Title: PM Narendra Modi visits Dehu Sant Tukaram Maharaj Temple closed for two days for devotees