PM Narendra Modi in Dehu | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 02:04 PM2022-06-14T14:04:37+5:302022-06-14T14:15:18+5:30

देहूत मोदींचे जंगी स्वागत....

PM Narendra Modi in Dehu Prime Minister Modi arrives in Dehu | PM Narendra Modi in Dehu | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा

PM Narendra Modi in Dehu | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा

Next

पुणे : श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीदेहू दौऱ्यावर आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांचे देहूत आगमन झाले आहे. देहूत मोदींचे जंगी स्वागत झाले आहे. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त वारकरी देहूत दाखल झाले आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी वारकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे देहूत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली आहे. पंतप्रधानांचा सत्कार करण्यासाठी उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देण्यात येणार आहे.

Web Title: PM Narendra Modi in Dehu Prime Minister Modi arrives in Dehu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.