शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

जिल्ह्यातील साडेसतरा लाख जनावरांच्या चाऱ्याचे करावे लागणार नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 12:07 IST

पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याचा प्राथमिक आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देतयारी दुष्काळाची : जिल्हा दुष्काळ निवारण कक्षाची स्थापना राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असे वर्गीकरण खरीपातील उत्पादकता आणि रब्बीची लागवड लक्षात घेता आणखी दोन महिने चाऱ्याचा प्रश्न नाहीजिल्ह्यात आत्तापर्यंत २७ टँकर सुरु

पुणे : राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा दुष्काळ निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येत्या काळात पाण्याबरोबरच चाऱ्याचाही दुष्काळ जाणवणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. जिल्ह्यातील साडेसतरा लाख जनावरांना दररोज ५ हजार ७३६ टन चारा आवश्यक आहे. त्यानुसार चाऱ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली. राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.त्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर (सासवड), वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर , शिरूर (घोडनंदी) अशा सात ठिकाणी मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर दुष्काळ आणि टंचाई निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याचा प्राथमिक आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पाणी प्रश्नासाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी, तर चाऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. विविध ठिकणच्या मागणीनुसार तहसीलदारांच्या माध्यमातून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेने संबंधित ठिकाणी टँकर सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत २७ टँकर सुरु झाले आहेत. त्यात आंबेगाव तालुक्यात १, बारामती १०, दौंड ४, जुन्नर आणि पुरंदर प्रत्येकी २, तर शिरुरला ८ टँकर सुरु असल्याचे डॉ. कटारे यांनी सांगितले. खरीपातील उत्पादकता आणि रब्बीची लागवड लक्षात घेता आणखी दोन महिने चाऱ्याचा प्रश्न जाणवणार नाही. मात्र, त्यानंतर चाऱ्याची उपलब्धता करुन द्यावी लागेल. त्यादृष्टीने प्राथमिक आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात १७ लाख ५६ हजार ६४ जनावरे आहेत. त्यात गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांचा समावेश आहे. त्यांना दररोज ५ हजार ७३६ तर महिना १ लाख ७२ हजार ८० टन चारा आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. कटारे म्हणाल्या. ---------------जनावरांची संख्या मोठी जनावरे        ८,५४,७०३लहान जनावरे        २,०२,७२०शेळ्या - मेंढ्या        ६,९८,६३२

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळ