शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या पाण्याचे नियोजन करा

By admin | Updated: August 21, 2015 02:34 IST

गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेस

पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेस साधी पाणी नियोजनाची मागणीही करण्यात आलेली नाही. तर पालकमंत्र्यांनाही या स्थितीचे गांभीर्य नाही. त्यामुळे आता जलसंपदा खाते झोपले असले, तरी महापालिकेनेच पाण्याचे नियोजन सुरू करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत केली. मुख्य सभा सुरू होताच विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी शहराच्या पाण्याची स्थिती गंभीर असून, धरणांमध्ये अवघे ५० टक्के पाणी आहे. त्यामुळे महापालिकेचे नियोजन काय आहे, पाटबंधारे विभागाकडून पालिकेस किती पाणी दिले जाणार, पुणेकरांना कपातीची कल्पना देण्यासाठी काय नियोजन केले, याचा खुलासा करण्याची मागणी केली. या वेळी मनसेने पाण्यावर चर्चा करू नये अशी मागणी केली. पाण्यावर चर्चेसाठी खास सभा बोलविण्याची मागणी मनसेने केली असून, या सभेत ही चर्चा केली जावी अशी मागणी मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी केली. तसेच ही चर्चा थांबविण्यासाठी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने या तहकुबीच्या विरोधात मतदान करून सूचना फेटाळून लावली. त्यानंतर पुन्हा पाण्यावरील चर्चेस सुरुवात करण्यात आली. या वेळी नगरसेवकांनी महापालिकेनेच नियोजन करावे अशी मागणी केली. ही पाण्याची स्थिती म्हणजे भविष्यातील पाणीटंचाईचे सावट असून महापालिकेने इतर पर्यायी स्रोतांची माहिती घेऊन त्याचा वापर सुरू करावा अशी मागणी उपमहापौर आबा बागूल यांनी केली. समान पाणीवाटप आणि गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक किशोर शिंदे, सचिन भगत, बाबूराव चांदेरे, सभागृह नेते बंडू केमसे यांनी केली. महापालिका तसेच जलसंपदा विभागाकडून दरवर्षी पाण्याचे एका वर्षासाठी नियोजन केले जाते. मात्र, पावसाची अनिश्चितता पाहता, यापुढे दोन वर्षांचे नियोजन केले जावे, अशी मागणी रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली. तसेच या पुढे महापालिकेने पाण्याची श्वेतपत्रिका काढावी असेही ते म्हणाले. शहरातील पाणीपुरवठा असमान असून, मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. तसेच पाणी बांधकामासाठी वापरले जाते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, जलतरण तलाव बंद करावेत, टँकरची पाणीचोरी थांबवावी, अशी मागणीही धेंडे यांनी या वेळी केली.(प्रतिनिधी)