Crime News : जुन्या वादाचा राग मनात धरून कोयत्याने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:37 IST2025-10-28T13:34:32+5:302025-10-28T13:37:21+5:30
- दुचाकीवर आलेल्या तिघा अल्पवयीन मुलांनी जुन्या वादाच्या रागातून हल्ला केला.

Crime News : जुन्या वादाचा राग मनात धरून कोयत्याने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : जुन्या वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीतील सम्राट चौकात शनिवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद सलीम शेख (वय १७, रा. मोरवाडी) असे गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सतरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरिफ हनीफ शेख (वय २३, रा. मस्जिद शेजारी, मोरवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अरिफ हे त्यांचे मित्र केविन सोनवणे आणि जावेद यांच्यासोबत रिक्षामध्ये बसलेले होते. दुचाकीवर आलेल्या तिघा अल्पवयीन मुलांनी जुन्या वादाच्या रागातून हल्ला केला. एका अल्पवयीन मुलाने कोयत्याने जावेद याच्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर वार केले. तर, इतर दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यात जावेद गंभीर जखमी झाला.