लग्नातील अनिष्ट प्रथा; माजी महापौरांचा विरोध, पत्र पाठवून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:24 IST2025-05-28T09:22:28+5:302025-05-28T09:24:21+5:30

वधू-वरांना आशीर्वाद, पुढाऱ्यांचा सत्कार अशा अनिष्ट प्रथांच्या विरोधात माजी महापौर अंकुश काकडे यांनी काही वर्षापूर्वी आवाज उठवत जाहीर आवाहन केले होते

pimpari-chinchwad Unwanted customs in marriage; Former mayor opposes | लग्नातील अनिष्ट प्रथा; माजी महापौरांचा विरोध, पत्र पाठवून आवाहन

लग्नातील अनिष्ट प्रथा; माजी महापौरांचा विरोध, पत्र पाठवून आवाहन

पुणे :लग्नसोहळ्यातील राजकारण्यांची उपस्थिती, त्यांच्या हस्ते वधू-वरांना आशीर्वाद, पुढाऱ्यांचा सत्कार अशा अनिष्ट प्रथांच्या विरोधात माजी महापौर अंकुश काकडे यांनी काही वर्षापूर्वी आवाज उठवत जाहीर आवाहन केले होते. वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या हुंडाबळीनंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या आवाहनाचे समाजमाध्यमावरून स्मरण करून दिले आहे. 

लग्नसमारंभात राजकारण्यांना निमंत्रीत करून त्यांची वाट पाहणे, त्यासाठी मुहूर्त लांबवणे, जावयाचा तसेच अन्य नातेवाइकांचा मानपान स्टेजवर करणे, अशा अनेक प्रथांच्या विरोधात अंकुश काकडे यांनी १९९६ मध्ये आवाज उठवला होता. अशा प्रथा पाडू नका, अनावश्यक गोष्टींना महत्त्व देऊ नका, पुढाऱ्यांसाठी लग्नमुहूर्त लांबवू नका, असे जाहीर आवाहन त्यांनी केले होते. तसे एक पत्रच त्यांनी छापून घेतले होते. निमंत्रण आलेल्या प्रत्येक कुटुंबाला ते हे पत्र पाठवत, आधी खातरजमा करून घेत व त्यानंतरच त्या लग्नाला उपस्थिती लावत. त्यामुळे लग्नानंतर त्या कुटुंबियांची जबाबदारी वाढत होती.

आवाहनाशी प्रामाणिक राहिलो

सन १९९६ मध्ये केलेल्या आपल्या आवाहनाशी आपण स्वतः तसेच माजी आमदार उल्हास पवार व माजी मंत्री शशिकांत सुतार हे दोघे अजूनही प्रामाणिक राहिलो आहोत, अन्य कोणाकडून मात्र या साध्या गोष्टीचे पालन होत नाही. राजकीय पदाधिकारी, मंत्री, पुढारी यांनी कृपया लग्न समारंभात, तरी आपला तामझाम सोडून साधेपणाने उपस्थिती लावावा.

Web Title: pimpari-chinchwad Unwanted customs in marriage; Former mayor opposes