शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 18:43 IST

प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक दोन चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत

पुणे : जगभरातील ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी चित्रपट रसिकांना देणारा पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान होणार आहे.

महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागामध्ये १४ चित्रपटांची निवड करण्यात आली असून ‘चित्रपट एक आशा’ (सिनेमा इज अ होप) हे यंदाच्या चित्रपट महोत्सवाचे सूत्र आहे. महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शुक्रवार (दि.२३) डिसेंबर www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार असून, चित्रपटगृहांवर नाेंदणी प्रक्रिया (दि.५) जानेवारीपासून सुरू होणार आहे.

महोत्सवातील चित्रपट सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (सहा पडदे), लष्कर परिसरातील आयनॉक्स (तीन पडदे) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात (दोन पडदे) या तीन ठिकाणी दाखविले जाणार आहेत. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक दोन चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते यावेळी उपस्थित होते.

जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपट

अ सेन्सेटीव्ह पर्सन (दिग्दर्शक - तोमास क्लेन, झेक रिपब्लिक, स्लोव्हाक रिपब्लिक)ब्लागाज लेसन्स (दिग्दर्शक - स्टीफन कोमांदरेव्ह, बल्गेरिया, जर्मनी)सिटीझन सेंट (दिग्दर्शक - तिनातीन कजरिशविली, जॉर्जिया, बल्गेरिया, फ्रान्स)फ्लाय ऑन (दिग्दर्शक - ताकुया कातो, जपान)हिअर (दिग्दर्शक - बास दिओस, बेल्जियम)ओशन आर द रिअल कॉन्टिनेंटस् (दिग्दर्शक - तोमासो सांताम्ब्रिजिओ, क्युबा, इटली)पुआन (दिग्दर्शक - मारिया अल्शे, बेंजामिन नाईश्टॅट, अर्जेनटिना, इटली,फ्रान्स, जर्मनी, ब्राझिल)शल्मासेल (दिग्दर्शक - सिल्क एन्डर्स, जर्मनी)टेरिस्टेरीयल व्हर्सेस (दिग्दर्शक - अलीरेझा खतामी, अली असगरी, इराण)द बर्डन (दिग्दर्शक - अमर गमाल, येमेन, सुदान, सौदी अरेबिया)द ड्रीमर (दिग्दर्शक - अनाईस टेलेने, फ्रान्स)द सेन्टेन्स (दिग्दर्शक - फ्राजिल रझाक, मल्याळम, भारत)टोल (दिग्दर्शक - कॅरोलिना मार्कोविझ, ब्राझिल, पोर्तुगाल)टुमारो इज अ लॉंग टाईम (दिग्दर्शक - ज्यो झी वी, सिंगापोर, तैवान,फ्रान्स, पोर्तुगाल)

टॅग्स :PuneपुणेPIFFपीफartकलाcinemaसिनेमाcultureसांस्कृतिकInternationalआंतरराष्ट्रीय