Pune: नगर-कल्याण महामार्गावर पिकअप-मोटरसायकलचा भीषण अपघात, एकजण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 17:45 IST2023-09-19T17:43:35+5:302023-09-19T17:45:10+5:30
यामध्ये मोटार सायकलस्वार ठार झाला आहे...

Pune: नगर-कल्याण महामार्गावर पिकअप-मोटरसायकलचा भीषण अपघात, एकजण ठार
ओतूर (पुणे) : नगर-कल्याण महामार्गावर ओतूर येथील ढमालेमळा येथील कृष्णकुंज बंगल्याजवळ पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलस्वार ठार झाल्याची माहिती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, मंगळवार (दि. १९) सकाळी १२.३० च्या सुमारास पंकज सोपान वामन (वय- ३७) व पत्नी प्रियांका वामन (रा. पिंपळवंडी काळवाडी ता.जुन्नर) हे आळेफाट्याच्या दिशेने मोटरसायकलवरून (एम.एच ०७ बी२७७२) येत होते. त्यावेळी पिकअप (एम.एच. १४ एच.यु ३०६९) कल्याणच्या दिशेने जात असताना ओतूर येथील ढमालेमळा येथील कृष्णकुंज बंगल्याजवळ भीषण अपघात झाला. यात मोटर सायकलस्वार पंकज वामन जागीच ठार झाला असून पत्नी जखमी झाली आहे.
पंकज वामन यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पिकअप चालक बाबुराव पोपट (कुऱ्हाडे रा. निमसेमळा रोड आळे ता. जुन्नर) पीकअप जागेवरच सोडून फरार झाला. चालकाविरोधात फिर्याद दाखल झाली आसून पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुरेश गेंगजे करत आहेत.