पाईट(पुणे) : खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी महिला भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप अपघातात ८ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर बाकी २० ते २२ महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पाईट येथे श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी चाललेली महिलांची पिकअप गाडी ही कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर घाट चढत होती. पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे येऊन सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये असलेल्या २८ ते ३० महिला जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. आठ ते दहा महिला अत्यावस्थ असून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले होते. मात्र आता या ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत शोभा ज्ञानेश्वर पापड, सुमन काळूराम पापड, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई न्यानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे, या महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालुबाई लक्ष्मण चोरघे , जया बाळू दरेकर, लता ताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ, जयश्री पापळ, मनीषा दरेकर, लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे, सिद्धी ज्ञानेश्वर पापळ, कविता सारंग चोरगे, सुलाबाई बाळासाहेब चोरगे, सिद्धीकार रामदास चोरगे, छबाबाई निवृत्ती पापळ, सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, पुनम वनाजी पापळ, जाईबाई वनाजी पापळ, चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर, मंदा चांगदेव पापळ या महिला जखमी आहेत.