विवाहितेने माहेरून पैसे आणावेत म्हणून केला शारीरिक व मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 19:41 IST2021-03-20T19:41:14+5:302021-03-20T19:41:52+5:30

छळ प्रकरणी सासरच्या लोंकांविरोधात गुन्हा दाखल

Physical and mental harassment in order to bring money from Maher | विवाहितेने माहेरून पैसे आणावेत म्हणून केला शारीरिक व मानसिक छळ

विवाहितेने माहेरून पैसे आणावेत म्हणून केला शारीरिक व मानसिक छळ

ठळक मुद्देविवाहितेने केली दिघी पोलिसात तक्रार

पिंपरी: विवाहितेने नोकरी करावी तसेच माहेरून दागिने व पैसे आणावे यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ताजणे मळा, चऱ्होली येथे एप्रिल २०१८ ते १९ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. 

विवाहित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १९) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती सुधीर सतिश गायकवाड, सासु रंजना सतीश गायकवाड, दीर समीर सतिश गायकवाड, जाऊ वैशाली समीर गायकवाड (सर्व रा. ताजणे मळा, चऱ्होली), नणंद प्रीती विल्सन साळवे (रा. लोहगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला स्वयंपाक येत नाही फिर्यादीने नोकरी करावी व माहेरून दागिने तसेच पैसे आणावेत या कारणासाठी आरोपींनी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला.

Web Title: Physical and mental harassment in order to bring money from Maher