Pune | भांडणातील मुलांची नावे सांग म्हणत मुलाला नग्न करुन काढले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 18:25 IST2023-03-04T18:22:54+5:302023-03-04T18:25:01+5:30

कपडे काढून त्याला नग्न करुन फोटो काढल्याचा प्रकार समोर...

Photographs were taken of the child naked to tell the names of the children in the fight | Pune | भांडणातील मुलांची नावे सांग म्हणत मुलाला नग्न करुन काढले फोटो

Pune | भांडणातील मुलांची नावे सांग म्हणत मुलाला नग्न करुन काढले फोटो

पुणे : भांडणातील मुलांची नावे सांगावी म्हणून गुंडांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला तळजाई पठारावर पळवून नेले. तेथे त्यांचे कपडे काढून त्याला नग्न करुन फोटो काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी धनकवडीत राहणाऱ्या मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित पाटील ऊर्फ मायाभाई (रा. जनता वसाहत), प्रमोद कळंबे या सराईत गुंडासह त्याच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना लक्ष्मीनगर येथील शाहु कॉलेज येथून सूर्या चौक आंबेगाव व तळजाई पार येथे गुरुवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली़

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शाहु कॉलेज येथे असताना साई, सुमित यांनी त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर दोघांमध्ये बसवून साई सिद्धी चौकापासून सूर्या चौकात नेले. तेथून तळजाई पार येथे मोकळ्या मैदानात आणले. तेथे अभिजित पाटील याने या मुलाला काल तळजाई येथे झालेल्या भांडणातील मुलांना घेऊन ये, असे म्हणून धारदार हत्यार गळ्याला लावून खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली. या मुलाचे सर्व कपडे काढून नग्न करुन त्याचे फोटो काढले. त्याने ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अभिजित पाटील व प्रमोद कळंबे हे सराईत गुंड असून पोलीस उपनिरीक्षक कामे तपास करीत आहेत.

Web Title: Photographs were taken of the child naked to tell the names of the children in the fight