शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

पुणे विद्यापीठात शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करा: भाजप शहराध्यक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 8:37 PM

शिवाजी महाराजांच्या सविस्तर इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश असावा अशी मागणी भाजप शहराध्यक्षांनी केली आहे.

ठळक मुद्देशिवाजी महाराजांची न्याय पध्दत, चलन, व्यापार, कर पध्दती,आदी विषयांचा समावेश असावा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुण वैशिष्ट्यांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा आणि या विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन केली.     शिवाजी महाराजांचे बालपण, विजापूर घराण्याशी संघर्ष, अफजलखानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, पावनखिंडीतील लढाई, मुघलांबरोबरील संघर्ष, शाहिस्तेखानावरील हल्ला, राज्याभिषेक आदी प्रसंगांचा सविस्तर इतिहास अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात असावा आणि दुस-या भागात शिवाजी महाराजांची न्याय पध्दत, अष्टप्रधान मंडळ, जमीन महसूल, चलन, व्यापार, कर पध्दती, सामाजिक व्यवस्थापन, प्रशासन, संस्कृत आणि मराठीचा प्रसार, धार्मिक धोरण, लष्कर, किल्ले, नौदल, शिवाजी महाराजांनंतरचे मराठा साम्राज्य आदी विषयांचा समावेश असावा असे श्री. गोगावले यांनी म्हटले आहे. विद्यापीठात हा अभ्यासक्रम शिकवित असतानाच तो दूरशिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकता यावा अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी. आर्थिक मागस विद्यार्थ्यांना फेलोशिप व शिष्यवृत्ती द्यावी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विशेष उत्तेजन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnitin karmalkarनितीन करमळकर