मांजराचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 07:19 PM2023-06-06T19:19:06+5:302023-06-06T19:20:43+5:30

खेड तालुक्यातील चास येथील घटना...

person who went to save the life of a cat that fell into a well drowned pune khed news | मांजराचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

मांजराचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

googlenewsNext

राजगुरुनगर (पुणे) : विहिरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  दि. ६ रोजी  चास ,ता खेड  येथे घडली आहे. भगवान केशव काळे (वय ४४ रा. चास ता- खेड ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चास येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील पेट्रोल पंपाशेजारी विहिरित मांजर पडले होते. पडलेल्या मांजराचा जीव वाचविण्यासाठी मयत भगवान काळे कॅरेट घेऊन पाण्यात उतरले होते. परंतु काळे यांना पोहता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडुन मूत्यू झाला. या घटनेबाबत मयताचे नातेवाईक ममलेश मुरलीधर वाघमोडे याने खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे

 

Web Title: person who went to save the life of a cat that fell into a well drowned pune khed news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.