शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 6:33 PM

स्वत: राँग साइड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़.

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपी रवी अशोक सरतापे याला अटक

पुणे :  स्वत: राँग साइड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़.याप्रकरणी मुंढवापोलिसांनी रवी अशोक सरतापे (वय ३२, रा़ नताशा एन्क्लेव्ह, कोंढवा खुर्द) याला अटक केली आहे़. रवी सरतापे हा काहीही काम धंदा करत नाही़. मुंढव्यात सोमवारी एका वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत मजल गेली़.  याप्रकरणी वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्या गेल्या ३ वर्षांपासून हडपसर वाहतूक शाखेत नेमणुकीला आहे़. सोमवारी (दि.२०आॅगस्ट) सकाळी त्या मुंढवा येथील महात्मा फुले चौकात वाहतूक नियमन करण्याचे काम करीत होत्या़. अकराच्या सुमारास रवी सरतापे हा केशवनगरकडून राँग साईडने येऊन मुंढव्याकडे जाणाऱ्या सिग्नलला थांबला होता़. त्यावेळी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला मुंढव्याकडून येणारा सिग्नल सुटणार आहे़. तुमच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, तुमची गाडी सिग्नलला साईडला घ्या़. तेव्हा त्यांना तोएकेरी भाषेत तूच साईडला हो़, त्यावर त्यांनी तू मला अरे तुरे बोलू नकोस असे म्हणाल्या़. त्याने मी अधिकाऱ्याचा मुलगा आहे़, तू मला काही शिकवू नकोस़, तेव्हा त्यांनी गाडी साईडला घ्या व वडिलांना बोलवा असे सांगितले़. रवी सरतापे हा वाद घालत असल्याचे पाहून त्याच चौकात असलेले पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तेथे आले व त्यांनी पोलीस शिपाई आढाव यांना गाडीला जॅमर लाव़ त्यास त्याचे वडिलांना घेऊन येऊ दे, असे म्हणाले़. त्यावर रवीने मी सगळ्यांना बघून घेईऩ माझे कोणी काही वाकडे करु शकणार नाही़, अशी धमकी देऊन या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला़ व वडिलांना घेऊन येतो, असे म्हणतच तो मुंढव्याच्या दिशने गेला़.  हवालदार भोसले यांना भेटला़. त्याच्या पाठोपाठ या महिला कर्मचारी गेल्या व हवालदार भोसले यांना घडला प्रकार सांगत असताना त्याने या महिला कर्मचाऱ्यांचा हात धरण्याचा प्रयत्न केला़. त्यांनी हात झटकल्यावर त्याने अश्लील शिवीगाळ केली़. भोसले त्याला समजावून सांगत असताना त्याने या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली़. त्यामुळे तेथे लोकांची गर्दी झाल्याने भोसले यांनी त्याला मुंढवा पोलीस ठाण्यात नेले़ .महिला कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा करुन त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्याचा विनयभंग करणाऱ्या व शासकीय कामात अडथळा केला म्हणून पोलिसांनी रवी सरतापे याला अटक केली़.     

टॅग्स :MundhvaमुंढवाPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसMolestationविनयभंग