येरवड्यात दोन पिस्तुले बाळगणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 17:21 IST2019-02-25T17:19:45+5:302019-02-25T17:21:56+5:30
फुलेनगर येथील आरटीओ कार्यालय पोलिसांनी सापळा रचून एका पकडले़ त्याच्याकडून दोन देशी पिस्तुले, ५ जिवंत काडतुस, एक पालघन, एक कोयता असा माल जप्त केला आहे.

येरवड्यात दोन पिस्तुले बाळगणाऱ्यास अटक
पुणे : फुलेनगर येथील आरटीओ कार्यालय पोलिसांनी सापळा रचून एका पकडले़ त्याच्याकडून दोन देशी पिस्तुले, ५ जिवंत काडतुस, एक पालघन, एक कोयता असा माल जप्त केला आहे.
महेश श्रीहरी गारुते (वय २७, रा़ बकोरी, ता़ हवेली) असे त्याचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्यावर विरुद्ध गुन्हे दाखल आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, फुलेनगर आयटीओजवळ एक जण हत्यारे घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, मांजुळकर, जाधव, रणदिवे, पाटील व सकट या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री सापळा रचला. महेश गारुते हा मोटारीतून तेथे आला. पोलिसांनी त्यांना पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुल व ५ जिवंत काडतुसे मिळाली. मोटारीत पालघन, कोयताही मिळाला. पोलिसांनी मोटारीसह ही सर्व हत्यारे जप्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी अधिक तपास करीत आहेत.