शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुणे जिल्ह्यात औद्योगिक कारणासाठी २० टक्के ऑक्सिजन वापर करण्यास अखेर परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 19:49 IST

वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनमध्ये ४४ टक्क्यांनी घट

पुणे : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने शासनाने औद्योगिक वापराचा ऑक्सिजन बंद करून शंभर टक्के ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय कारणासाठी राखीव ठेवण्यात आला. याच उद्योग विश्वावर चांगलाच परिणाम झाला. यामुळेच आता जिल्ह्याच्या वैद्यकीय ऑक्सिजन मागणीत ४४ टक्के घट झाल्याने जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यापुढे २०  टक्के ऑक्सिजन औद्योगिक कारणासाठी वापरण्यात येईल असे स्पष्ट केले. परंतु रुग्ण संख्या वाढल्यानंतर पुन्हा औद्योगिक वापराचा ऑक्सिजन बंद करण्यात येईल असे देखील स्पष्ट केले. 

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि गेल्या दोन-तीन महिन्यांत कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून व कोविड रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व सीसीसी व डीसीएच सेंटर,शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये शंभर टक्के मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासनाने औद्योगिक प्रयोजनासाठी २०% ऑक्सिजनचा वापर करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी स्वतंत्र आदेश काढले. यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन निर्मिती करावी. उत्पादित केलेल्या एकूण ऑक्सिजन पैकी ८० टक्के वापर हा मेडीकल ऑक्सीजनचा  पुरवठा रुग्णालयांना करण्यात यावा.  तसेच उर्वरीत ऑक्सीजन पैकी २० टक्के वापर हा औद्योगिक प्रयोजनासाठी करण्यात यावा. यामध्ये प्रथम प्राधान्य रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात येऊन त्यानंतर औद्योगिक प्रयोजनासाठी पुरवठा करण्यात यावा. कोविड- १९ विषाणू प्रादुर्भावाचे अनुषंगाने आवश्यकता भासल्यास औद्योगिक प्रयोजनासाठी वळविण्यात आलेला २० टक्के ऑक्सिजनचा वापर हा रुग्णालयांसाठी पुरविण्यात येईल, असे लेखी आदेश काढले आहेत. --------पुण्यात ऑक्सिजनचा वापर मे.टन वरून १९० मे.टनावर पुणे जिल्ह्यात कोरोच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला १० हजारांच्या घरामध्ये गेली होती. त्यामुळेच एकट्या पुणे जिल्ह्यासाठी दिवसाला सरासरी ४२० मे.टन ऑक्सिजन लागत होता. आता रुग्ण संख्या कमी झाल्याने ऑक्सिजन मागणी १९० मे.टन पर्यंत खाली आली आहे. यामुळेच औद्योगिक वापराचा ऑक्सिजन सुरू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेOxygen Cylinderऑक्सिजनzpजिल्हा परिषदMIDCएमआयडीसीbusinessव्यवसाय