शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"राणेंच्या सत्तेची मस्ती जनताच बरोबर उतरवेल", पुण्यात महाविकास आघाडीकडून टीका करत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:52 IST

राणेंसह भाजपालाही घोषणांचा अहेर, मंडईत टिळक पुतळ्याजवळ आंदोलन

ठळक मुद्देतिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी एकत्र आल्याने मंडईत गर्दी

पुणे : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे नारायण राणे यांना सत्तेची मस्ती आली आहे, जनताच ती बरोबर ऊतरवेल अशी टीका करत महाविकास आघाडीच्या वतीने मंडईत टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे रमेश बागवे, आबा बागूल,शिवसेनेचे संजय मोरे यांच्या नेत्रुत्वाखाली टिळक पुतळ्याजवळ एकत्र येत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राणे तसेच भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

जगताप म्हणाले की राणे यांची जीभ घसरली, त्यांना भाजपाच बळ देत आहे. भाजपालाही याची किंमत चुकवावी लागेल. बागवे यांनी भाजपा ही चुकीची संस्कृती आणत आहे असे सांगितले. मोरे यांनी राणे व त्यांच्या मुलांना जनतेने पराभवाचा धडा शिकवला, पण त्यांना तो समजला नाही अशी टीका करत राणे यांचा निषेध केला.राणे व भाजपाच्या नावाने वेगवेगळ्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी एकत्र आल्याने मंड ईत गर्दी झाली होती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस