शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींची गावेही स्वच्छतेसाठी उदासीन

By admin | Updated: May 20, 2015 23:11 IST

आतापर्यंत तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५९ लाख ७० हजार २०० रुपयांचे शौचालयाचे अनुदान दिले असतानाही येथील ३२ हजार २२७ कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नसल्याचे समोर आले आहे

इंदापूर : आतापर्यंत तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५९ लाख ७० हजार २०० रुपयांचे शौचालयाचे अनुदान दिले असतानाही येथील ३२ हजार २२७ कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गावांमधील स्थितीही समाधानकारक नाही. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी गावातील कुटुंबांची संख्या ७९६ आहे. त्यापैकी ४०० कुटुंबांना स्वच्छतागृहे नाहीत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातील कुटुंब संख्या २८०९ आहे. त्या पैकी १९०२ कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत.‘स्वच्छ भारत अभियाना’च्या मंगळवारी (दि. १९ मे) मिळालेल्या आकडेवारीनुसार , तालुक्यातील एकूण ११३ ग्रामपंचायतींच्या हद्दीत राहणाऱ्या ६० हजार ८५४ कुटुंबांपैकी २८ हजार ६२७ कुटुंबांकडे स्वच्छतागृहे आहे, तर ३२ हजार २२७ सत्तावीस कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.याबाबत ‘लोकमत’शी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण तालुका हगणदारीमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पन्नास लाख रुपयांचे अनुदान तालुक्यास मिळाले आहे. शौचालय बांधणाऱ्या कुटुंबास बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीनशे कुटुंबांची स्वच्छतागृहांची मागणी आली आहे. आम्ही गावनिहाय प्रस्ताव एकत्र करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक महिन्याला तीन हजार या प्रमाणे शौचालय उभारणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आकडेवारीत फरक (कंसात पंचायत समितीचा आकडा)एकूण गावे :११३कुटुंब संख्या : ६२३६१ (६0,८५४)शौचालये आहेत : ३५७0९ (२८,६२७)शौचालये नाहीत : २६६५२ (३२,२२७)