शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक मंचाचा दणका; १ वर्षांची कैद व १० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:35 IST

याप्रकरणी नागेश नारायण मराठे, कौस्तुभ नागेश मराठे आणि ऐश्वर्या मराठे यांनी तक्रार केली होती.

पुणे : ग्राहक मंचाने दिलेल्या निर्णयाची १३ वर्षात पूर्णपणे अंमलबजावणी न केल्याने ग्राहक मंचाने एका बांधकाम व्यावसायिकाला १ वर्षांची साधी कैद व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. काजळे असोसिएटस आणि विजय काजळे अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. 

ग्राहक मंचाने १९९९ च्या तक्रार अर्जावर २००६ मध्ये निकाल दिला होता. राज्य ग्राहक आयोगाने २०१६ मध्ये तो निकाल कायम केला होता. असे असतानाही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मंचाने ही शिक्षा ठोठावली. हा निर्णय ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य संगीता देशमुख आणि क्षितिजा कुलकर्णी यांनी दिला आहे.

याप्रकरणी नागेश नारायण मराठे, कौस्तुभ नागेश मराठे आणि ऐश्वर्या मराठे यांनी तक्रार केली होती. रंजना मराठे यांनी शनिवार पेठेत काजळे असोसिएटसकडून फ्लॅट खरेदी केला होता. त्यांना त्या फ्लचा ताबा  १९९५ मध्ये मिळाला. मात्र, फ्लॅटमध्ये अनेक अनियमितता व त्रुटी होत्या. आरोपींना फ्लॅटच्या इमारतीचा मंजूर प्लॅन दाखविला नाही. मनपाचे इलेक्ट्रासिटी कनेकशन, तळमजल्यावरील पाण्याच्या टकीमध्ये व्यवस्थित पाणी थांबत नाही. रंगकाम, पार्किंगची जागा, इतर कामे व्यवस्थति केलेली नाही़. इमारतीचे कन्व्हेयस डिड करुन द्यावे, वॉटर प्रूफिंग करुन देण्याची मागणी मराठे यांनी केली होती. त्यावर मंचाने वॉटर प्रूफिंगसाठी ४० लाख रुपये देण्याचा निर्णय दिली. मात्र, यावर नाराज होऊन फिर्यादी राज्य आयोगात गेले. त्यांनी २०१६ मध्ये निकाल फिर्यादीच्या बाजूने दिला. त्यानंतर दोन वेळा आरोपीविरुद्ध वॉरंट काढून वॉटर प्रोफिंगृ करुन घेतले. मात्र, या निर्णयाची पुढील साडेतीन वर्षात अंमलबजावणी  करु शकले नाही. त्यामुळे मराठे यांनी अवमान अर्ज दाखल केला होता. त्यावर ग्राहक मंचाने काजळे असोसिएटसला १० हजार रुपये दंड आणि विजय काजळे यांना १ वर्षे साधी कैद शिक्षा सुनावली आहे. ....... ग्राहक मंचाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जिल्हा मंच, राज्य आयोग यांच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या कालावधीला आरोपींसारखे लोक मानणार नाहीत.  जनमानसात असा संदेश जाईल की, जरी राज्य आयोगाने, जिल्हा आयोगाने विहिती मुदतीत आदेशाची पूर्तता करण्याचा आदेश केला असला तरी, आदेशाची पूर्तता कधीही, केव्हाही, जाणीवपूर्वक, हेतूपुरस्पर टाळून आरोपींना जमेल तेव्हा केली तरी चालेल. त्यामुळे आरोपींना न्यायालयाच्या आदेशाचा धाक राहणार नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंगCourtन्यायालय