शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

‘पीडीडीई’ची इमारत रखडणार

By admin | Updated: August 6, 2015 03:17 IST

प्रिन्सीपल डायरेक्टर आॅफ डिफेन्स इस्टेटच्या सदर्न कमांड येथील (पीडीडीई) कार्यालयासाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचा निधी कमी असल्याने ती वेळेत

पुणे : प्रिन्सीपल डायरेक्टर आॅफ डिफेन्स इस्टेटच्या सदर्न कमांड येथील (पीडीडीई) कार्यालयासाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचा निधी कमी असल्याने ती वेळेत बांधून व्हावी, यासाठी ‘पीडीडीई’ने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे निधीची मागणी केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या बोर्डाची या मागणीमुळे अडचण झाली असली, तरी निधी परत करण्याच्या अटीवर अर्थसाह्य करण्याची तयारी बोर्डाने दर्शविली आहे. सदर्न कमांड येथे ‘पीडीडीई’च्या कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने ३ कोटी ८४ लाख रुपये मंजूर केले. पण, हा निधी अपुरा असल्याने इमारतीचे बांधकाम थांबणार आहे. त्यामुळे ‘पीडीडीई’ने बोर्डाकडे आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. ‘पीडीडीई’ला इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणखी सुमारे २ कोटी ६१ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी बोर्डाने आर्थिक सहकार्य करावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. ही रक्कम परत देण्याच्या अटीवर आर्थिक साह्य करण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)