‘पीडीडीई’ची इमारत रखडणार

By Admin | Updated: August 6, 2015 03:17 IST2015-08-06T03:17:02+5:302015-08-06T03:17:02+5:30

प्रिन्सीपल डायरेक्टर आॅफ डिफेन्स इस्टेटच्या सदर्न कमांड येथील (पीडीडीई) कार्यालयासाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचा निधी कमी असल्याने ती वेळेत

PDDE's building will be laid | ‘पीडीडीई’ची इमारत रखडणार

‘पीडीडीई’ची इमारत रखडणार

पुणे : प्रिन्सीपल डायरेक्टर आॅफ डिफेन्स इस्टेटच्या सदर्न कमांड येथील (पीडीडीई) कार्यालयासाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचा निधी कमी असल्याने ती वेळेत बांधून व्हावी, यासाठी ‘पीडीडीई’ने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे निधीची मागणी केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या बोर्डाची या मागणीमुळे अडचण झाली असली, तरी निधी परत करण्याच्या अटीवर अर्थसाह्य करण्याची तयारी बोर्डाने दर्शविली आहे.
सदर्न कमांड येथे ‘पीडीडीई’च्या कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने ३ कोटी ८४ लाख रुपये मंजूर केले. पण, हा निधी अपुरा असल्याने इमारतीचे बांधकाम थांबणार आहे. त्यामुळे ‘पीडीडीई’ने बोर्डाकडे आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. ‘पीडीडीई’ला इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणखी सुमारे २ कोटी ६१ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी बोर्डाने आर्थिक सहकार्य करावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. ही रक्कम परत देण्याच्या अटीवर आर्थिक साह्य करण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: PDDE's building will be laid