नदी सुधार करताना पर्यावरणकडे लक्ष द्या; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:39 IST2026-04-12T11:39:39+5:302026-04-12T11:39:58+5:30

- नदी पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’

Pay attention to the environment while improving the river; Environment Minister Pankaja Munde's advice | नदी सुधार करताना पर्यावरणकडे लक्ष द्या; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना

नदी सुधार करताना पर्यावरणकडे लक्ष द्या; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना

पुणे : नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण करताना ते पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त होईल, याकडे लक्ष द्या, अशा सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला केल्या. नद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच नदी पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नदी सुधार प्रकल्पांतर्गत पुण्यातील मुळा आणि मुठा नदी काठचे सुशोभिकरण करण्याचा प्रकल्प तसेच मैलामिश्रित सांडपाणी नदीत मिसळू नये, म्हणून जायका प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आहेत. या प्रकल्पांच्या कामाचा मुंडे यांनी शनिवारी महापालिकेत आढावा घेतला. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, प्रजित नायर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या बैठकीत हद्दीत निर्माण होणारे मैलापाणी, प्रकल्पांची प्रक्रिया क्षमता, अंमलबजावणी आणि निधी पुरवठा, मुख्य मलवाहिन्या व कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची आर्थिक स्थिती, प्रकल्पातील अडथळे याचे सादरीकरण केले. तसेच वारजे, वडगाव, मुंढवा, मस्त्यबीज केंद्र हडपसर, खराडी, धानोरी, बाणेर, तानाजीवाडी भैरोबा मैलापाणी शुद्धीकरण केंद्राची माहिती दिली.

बैठकीनंतर मुंडे म्हणाल्या, अनेक उद्योगांमध्ये एसटीपी उभारले जातात; मात्र योग्य देखभाल होत नसल्याने ते बंद अवस्थेत असतात. पुणे शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले जातील, ते बंद राहणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांबाबत कोणतेही तक्रार येणार नाही, याकडे लक्ष द्यावे. औंध येथील बोटॅनिकल गार्डनच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील.

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध जिल्ह्यांचा, विभागांचा अभ्यास करुन नवीन धोरण आणले जाईल. बारामती येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय पुणे येथेच राहील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असेही मुंडे यांनी सांगितले.

Web Title : नदी सुधार में पर्यावरण पर ध्यान दें: पंकजा मुंडे

Web Summary : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ने नदी सुधार कार्यों में पर्यावरण-अनुकूलता पर ज़ोर दिया। नदी पुनरुद्धार प्राधिकरण बनेगा। मुंडे ने पुणे की नदी परियोजना और सीवेज ट्रीटमेंट प्लांट की समीक्षा की, और एकीकृत गांवों के लिए नई नीतियों पर ज़ोर दिया।

Web Title : Focus on Environment While Improving Rivers: Pankaja Munde

Web Summary : Environmental Minister Pankaja Munde instructed officials to prioritize eco-friendly river improvements. A river rejuvenation authority will be established. Munde reviewed Pune's riverfront development and sewage treatment projects, emphasizing proper maintenance of treatment plants and new policies for integrated villages to manage sewage efficiently.