१० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा जप्तीची कारवाई, पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस; पाच दिवस उलटले तरीही कोणताही प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:26 IST2025-11-12T11:26:33+5:302025-11-12T11:26:45+5:30

Mumdhava Land Scam: मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वसुलीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे.

Pay 42 crores within 10 days otherwise confiscation action will be taken. | १० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा जप्तीची कारवाई, पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस; पाच दिवस उलटले तरीही कोणताही प्रतिसाद नाही

१० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा जप्तीची कारवाई, पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस; पाच दिवस उलटले तरीही कोणताही प्रतिसाद नाही

पुणे -  मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वसुलीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटिशीला कंपनीकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी मुदतीच्या आत म्हणजे १० दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा कंपनीच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.  पहिल्या खरेदीखतापोटी  २१ कोटी रुपये, तर रद्द करारनामा करण्यासाठी  २१ कोटी रुपये असे एकूण ४२ कोटी रुपये भरावेत, असे कंपनीला कळविले आहे. नोटीस देऊन आता पाच दिवस उलटले आहेत. मात्र, कंपनीकडून  खरेदीखत रद्द करण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. 

कंपनीला बाजू मांडावी लागणार
नोटिशीनंतर पंधरा दिवसांच्या आत खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या मुदतीत कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासमोर बाजू मांडावी लागेल.  ती मांडल्यानंतर प्रशासनाकडून कायदेशीर बाबींचा विचार करून त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर दस्तनोंदणी रद्द होऊ शकते. 

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राईझेसला नोटिशीद्वारे पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत कंपनीला निर्णय घ्यावा लागणार आहे. मुदत उलटून गेल्यानंतर त्यांच्यावर जप्तीची देखील कारवाई होऊ शकते. तसेच जेवढे मुद्रांक शुल्क बुडविले आहे, तेवढ्या रकमेवर दरमहा एक टक्का व्याज लागते.
- श्रीकांत जोशी, मार्गदर्शक,
अवधूत लॉ जोशी फाउंडेशन.

Web Title : पार्थ पवार की कंपनी पर बकाया स्टाम्प शुल्क के लिए जब्ती का खतरा।

Web Summary : मुंधवा भूमि सौदे में स्टाम्प शुल्क बकाया होने पर पार्थ पवार की अमेडिया कंपनी को 42 करोड़ रुपये का भुगतान करने या जब्ती का सामना करने की सूचना दी गई है। कंपनी ने पांच दिनों में कोई जवाब नहीं दिया है। उनके पास जवाब देने के लिए पंद्रह दिन हैं अन्यथा कानूनी कार्रवाई और बकाया राशि पर ब्याज लगेगा।

Web Title : Parth Pawar's company faces property seizure over unpaid stamp duty.

Web Summary : Parth Pawar's Amedia company is notified to pay ₹42 crore in stamp duty for a Mundhwa land deal or face seizure. The company hasn't responded in five days. They have fifteen days to respond or face legal action and accruing interest on the unpaid amount.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.