शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल : प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:24 PM

पुणे : ‘‘शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ ...

ठळक मुद्देभाजपा-कॉंग्रेसकडून नोटांद्वारे प्रचार : आपल्या वंचित असण्याला आपणही जबाबदार

पुणे : ‘‘शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा,’’ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शेवटची प्रचारसभा आंबेडकरांनी रविवारी (दि. २१) पुण्यात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अनिल जाधव (पुणे) आणि नवनाथ पडळकर (बारामती) या उमेदवारांसह आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर म्हणाले, की देशात घराणेशाहीचे राजकारण सुरु आहे. लोकशाही फुलवायची तर घराणेशाही संपली पाहिजे. जात, धर्म आणि वर्गाच्या वर्चस्वाच्या मक्तेदारी संपविणे आवश्यक असून जनतेने आपले मत विकू नये. कारण, मत विकत घेणाºया उमेदवाराची बांधिलकी पैसे घेणारांसोबत राहात नाही तर त्याच्यासाठी पैसे लावणाऱ्यासोबत असते.  ‘‘निवडणूक प्रचार बंद झाल्यानंतर दोन प्रमुख पक्षांकडून नोटांचा प्रचार सुरु होईल. मत विकत घेतले गेल्यामुळेच शहरांचा आणि झोपडपट्यांचा पाणी, वीज या पलीकडे विकास झाला नाही. आपण वंचित राहिलो याला आपणच जबाबदार असून एका दिवसाची दिवाळी करायची की भविष्यकाळ उज्ज्वल करायचा हे आपण ठरवायला हवे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे,’’ असा दावा आंबेडकरांनी यावेळी केला. महात्मा गांधींना गोळ्या घालणारी मानसिकता आजही जिवंत असून गांधींच्या हत्येनंतर इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या जातात. याच मानसिकतेचे उमेदवार पुण्याच्या रिंगणात उतरलेले आहेत. संविधान बदलणाºयांना जागा दाखवून द्या, असे अवाहन डॉ. आंबेडकरांनी केले. सत्ता आल्यास संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना कारागृहात डांबणार असल्याचेही त्यांनी सांगितले...................मोदींना ताकदीने भेटणार‘‘इंदूमिलच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदी म्हणाले, ‘तुम्ही मला भेटत नाही.’ असे विचारणाऱ्या मोदींना आता 23 मे नंतर ताकदीने भेटणार,’’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले. देशाची मालमत्ता मोदी कवडीमोल भावाने विकताहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

.................खरी लढाई भाजपसोबत‘‘लोकसभा निवडणूकांच्या जागा वाटपाबाबत मी बैठकीला बसा म्हणत असताना कॉंग्रेसवाल्यांनी दुर्लक्ष केले. पुण्यात काँगेसला उमेदवार मिळत नव्हता. शेवट मोहन जोशींना ‘बळीचा बकरा’ बनविण्यात आले. राज्यात कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर जाणार असून खरी लढाई भाजप आणि वंचित आघाडीमध्येच होणार आहे. आम्ही कॉंग्रेसशी भांडू, दोन हात करु पण भाजपासोबत जाणार नाही,’’ असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.    

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक