शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत हवा पवारांचीच; पण नेमक्या कोणत्या...? महारोजगार मेळाव्यातील शिट्ट्या, टाळ्यांमुळे महायुती गोंधळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 05:04 IST

बारामतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळले होते. त्यावरून बरीच चर्चाही रंगली. परंतु कार्यक्रमाच्या २४ तास अगोदर शरद पवारांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकण्यात आले.  

बारामती (जि. पुणे) : बारामतीत शनिवारी महायुतीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनासह ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक राजकीय  खलबते होणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र संपूर्ण कार्यक्रमावर कोणीही टीकाटिप्पणी केली नाही; मात्र व्यासपीठावर शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर, तसेच त्यांच्या भाषणावेळी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी  बारामतीकरांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला. त्यामुळे बारामती ही पवारांचीच असल्याचे सिद्ध झाले खरे; पण कोणत्या..? याचे मात्र गूढ कायम आहे. 

बारामतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळले होते. त्यावरून बरीच चर्चाही रंगली. परंतु कार्यक्रमाच्या २४ तास अगोदर शरद पवारांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकण्यात आले.  

दोन्ही नेत्यांच्या आगमनावेळी जल्लोष- शरद पवार यांनी व्यासपीठावर येण्यापूर्वी प्रवेशद्वारासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन करीत भेट घेतली. 

- पवारांचे व्यासपीठावर आगमन होताच बारामतीकरांनी एकच जल्लोष केला. यावेळी पवारांनी हात उंचावत बारामतीकरांना अभिवादन केले. 

- काही वेळानंतर शरद पवार यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात आले, तेव्हा बारामतीकरांनी शिट्ट्या, टाळ्या  वाजवत जल्लोष केला. अजित पवार यांच्या भाषणाच्या वेळीदेखील ‘एकच वादा... अजितदादा’ या घोषणा देण्यात आल्या.

‘साहेबां’चा तो कागद फडणवीसांनी ठेवला खिशातव्यासपीठावर शरद पवार यांनी फाइलमधून एक कागद काढत फडणवीसांना दिला आणि त्यावर दोघांनी चर्चा केली.  त्यानंतर ‘स्माइल’ देत फडणवीसांनी तो कागद घडी घालून परत खिशात ठेवला. नेमका कशाचा असेल तो कागद? याची उत्सुकता सर्वांनाच लागली. 

अजित पवारांपासून त्यांनी राखले अंतरव्यासपीठावर शरद पवार यांचे आगमन झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला; पण अजित पवार यांच्याकडे पाहणेदेखील त्यांनी टाळले. सुळे यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नमस्कार करीत स्वागत केले; मात्र अजित पवार यांच्याकडे जाणे सुळे यांनीही टाळले. दीपप्रज्वलनासाठी पवार यांचे प्रमुख पाहुण्यांमध्ये नाव घेण्यात आले; पण त्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले. 

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEmployeeकर्मचारी