हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन नसल्याने रुग्णाचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:51 IST2024-12-18T12:49:16+5:302024-12-18T12:51:19+5:30
हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन मिळाले नाही.

हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन नसल्याने रुग्णाचे हाल
हडपसर : पाळीव कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे हे महानगरपालिकेचे काम आहे. त्यामुळे जखमी रुग्णावर उपचार करणे हेही महानगरपालिकेचे काम आहे. मात्र ही दोन्ही कामे महापालिकेकडून होत नाहीत. हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन मिळाले नाही. तेथून ससून रुग्णालयात गेले असता तेथेही न मिळाल्याने रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
साडेसतरानळी येथील प्रा. काळुराम जगताप (वय-७०) यांना शनिवारी पहाटे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्या मांडीचे व दंडाचे अक्षरश: लचके तोडले. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयात धाव घेतली. मगरपट्टा येथील रुग्णालयात त्यांना दोन तास थांबवूनही लस मिळाली नाही. लस नसल्याचे म्हणत ससून रुग्णालयात पाठवले. त्यांनी ससूनला जाण्यास सांगितले. ससूनमध्ये गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलेले इंजेक्शन नाही. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात पाठवले. शनिवार असल्यामुळे तर त्यांनी टाळाटाळ केली. इंजेक्शन देण्याची शेवटी विनंती केल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिले. पण ससूनच्या डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन नाहक त्रास दिला. असे जगताप यांनी सांगितले. ससून रुग्णालयात गेले असता तेथील डॉक्टर म्हणाले की, गेली चार महिने ही लस आमच्याकडे उपलब्धच नाही, साडेसतरानळी या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. याबाबत अण्णासाहेब रुग्णालयाचे अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.