शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाच वर्षांत ४४० जनावरांची बिबट्यांनी केली शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 1:16 AM

जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे.

- रामनाथ मेहेरओतूर -  जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. वनविभागाकडून या बिबट्यांना योग्य ठिकाणी सोडण्यास यश मिळाले नाही की नागरिकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणे झाले नाही. मात्र, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जनावरांपासून मुकाव्या लागणाऱ्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई म्हणून वनविभागाने तब्बल ३४ लाख ८२ हजारांची नुकसानभरपाई दिली आहे.ओतूर आणि परिसरात बिबट्यांचा खुलेआम वावर वाढला आहे. रानावनात वास्तव्य करणारा बिबट्या गावठाण भागात नरजेस पडत असल्याने बिबट्याची ग्रामस्थांच्या मनात चांगलीच धास्ती बसली आहे. रात्रीच्या सुमारास ओतूरच्या शिवाजी रोड पाठीमागील गस्त गल्लीत बिबट्या सर्रास नजरेस पडतो आहे. या परिसरातील डुकरांच्या व भटक्या कुत्र्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असल्याने येथे दिवसाढवळ्या जाण्यासही नागरिक धजावत नाहीत.एकट्या जुन्नर तालुक्यात सुमारे चाळीसहून अधिक गावांत बिबट्यांचा वावर असल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने व डोंगर टेकड्यांच्या सपाटीकरणामुळे तो नागरी वस्तीकडे वळला आहे.रात्री गावात येऊन शिकार करण्यास झाला सराईतओतूर, आंबेगव्हाण, लागाचा घाट, रोहोकडी, शेटेवाडी, अहिंनवेवाडी, बेल्हे, आळे, खोडद, आंबेगाव, जोगा या भागांतच बिबट्या दिसायचा. क्वचितच तो गावातही यायचा अलीकडे मात्र हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. रोहोकडी, ओतूर, सारणी, चिल्हेवाडी येथील डोंगर, ओढे, नाले, नदी, ऊस शेती म्हणजे बिबट्यांची वस्तीच झाली आहे. त्यामुळे ते गावात येऊन शिकार करण्यात सराईत झाले आहेत.वनक्षेत्रपाल पडतात अपुरेओतूर वन विभागाच्या परिमंडल हद्दीत ११ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी जुन्नर, ओतूर अशी दोन वनपरिक्षेत्र कार्यालये देखभालीसाठी आहेत.वनविभागाच्या ब्ीाटनिहाय बिबट्याचे क्षेत्र वाढत आहे. त्यांना जेरबंद करायचे असल्यास वनक्षेत्रपाल आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.दोन्ही वनपरिक्षेत्रात बिबट्यांचा मोठा वावर आहे. सुमारे सत्तरपेक्षाही जास्त ठिकाणी बिबट्याचा वावर रोजचा झाला आहे.बिबट्यांची संख्या वाढली असली तरी पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्नही तितकेच केले जाते.बिबट्याला मारता येत नाही. त्याला पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडावे लागते. बिबट्याला मारता येत नाही. त्याला पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडावे लागते.बिबट्या अतिशय हिंस्र प्राणी असल्यामुळे त्याला पकडणे तितके सोपे नाही. मात्र, वनविभागाने यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी पिंजरे लावून बिबट्या पकडले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून बिबट्या दिसताच वनरक्षकाला कळविल्यास जास्तीत जास्त बिबटे पकडण्यात मोठी मदत मिळेल, अशी माहिती ओतूर वनपरिमंडल अधिकारी बापू येळे व वनपाल सचिन मोढवे यांनी दिली.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणेwildlifeवन्यजीव