डाेक्यावरच्या विगमध्ये लपवले साेने ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 17:19 IST2019-05-07T17:17:55+5:302019-05-07T17:19:51+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या एका व्यक्तीकडून 31 लाख रुपयांचे साेने जप्त करण्यात आले आहे.

डाेक्यावरच्या विगमध्ये लपवले साेने ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या एका व्यक्तीकडून 31 लाख रुपयांचे साेने जप्त करण्यात आले आहे. पुणे विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. शेझाद बाबा मिया माेमीन या व्यक्तीकडून हे साेने जप्त करण्यात आले.
एअर इंडियाच्या विमानाने शेझाद बाबा मिया माेमीन पुणे विमानतळावर आला असता कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली. तपासणीमध्ये माेमीन याच्याकडे 957.10 ग्रॅम इतके साेने आढळून आले. या साेन्याची किंमत तब्बल 31 लाख 13 हजार 446 इतकी आहे. या व्यक्तीने डाेक्यावरील विगच्या बेल्टमध्ये हे साेने लपवले हाेते.
हे साेने भारतात तस्करीसाठी आणण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने अधिकाऱ्यांनी सर्व साेने ताब्यात घेतले. तसेच कस्टमच्या कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशाकडे करण्यात आलेल्या चाैकशीत त्याने साेने तस्करीसाठी आणल्याचे कबूल केले. पुढील तपास अधिकारी करीत आहेत.