पुणे - मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने केलेले बेकायदा खरेदीखत सोमवारीही रद्द करण्यात आले नाही. जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार होते. मात्र, याबाबत काहीही हालचाल दिवसभरात झाली नसल्याचे दिसून आले.
४२ कोटी कोणत्या खात्यावरून भरणार? हा व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करताना संपूर्ण ७ % मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यामुळे ४२ कोटी रुपये अधिक त्यावरील दंड ३ लाख ६० हजार रुपये भरल्यावरच व्यवहार रद्द होईल.सोमवारी कंपनीकडून ४२ कोटी रुपये भरून व्यवहार रद्द केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली होती. मात्र, सोमवारी दिवसभरात व्यवहार रद्द झाला नाही. कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख रुपये असताना ही ४२ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्काची रक्कम नेमक्या कोणाच्या खात्यावरून सरकार जमा केली जाईल, हेही स्पष्ट होऊ शकले नाही.