शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

"खो-खो’खेळात ग्लॅमर नव्हतं, करीअर नव्हतं, पण प्रशिक्षकांच्या शब्दांनी बदललं आयुष्य!"

By श्रीकिशन काळे | Updated: January 25, 2025 19:18 IST

प्रियांकाचा प्रवास: विरोधातून कर्णधारपदापर्यंतची प्रेरणादायी कथा..!

पुणे : ‘‘मी लहानपणापासून खो खो खेळत आलेय. खरंतर माझ्या आई-वडिलांनी सुरवातीला विरोध केला. कारण त्यात करीअर नव्हते. त्याला ग्लॅमर नव्हते. पण माझ्या प्रशिक्षकांनी त्यांना समजावले आणि आज आई-वडिलांना माझा अभिमान वाटतो. खरंतर त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोचू शकले नसते,’’अशा भावना भारतीय खो खो महिला संघाच्या कर्णधार प्रियांका इंगळे हिने व्यक्त केल्या.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (दि.२५) भारतीय खो खो संघ विश्वविजेता ठरल्याने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. भारतीय खो खो पुरूष संघ आणि महिला संघातील खेळाडू प्रतिक वाईकर,सुयश गरगटे, रामजी कश्यप, आदित्य गणपुले, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पवार, प्रशिक्षक शिरीन गोडबोले, प्राची वाईकर फिजिओथेरपिस्ट डॉ. अमीर रव्हाटे, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव तथा महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रजित जाधव, सचिन गोडबोले, गोविंद शर्मा, संदीप तावडे आदी उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांनी सर्वांचा सन्मान केला. संघाचे उपाध्यक्ष श्रीकिशन काळे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रियांका म्हणाली, भारतीय संघाची मी कर्णधार असल्याने माझ्यावर थोडासा ताण होता. कारण संघातील सर्व खेळाडूंशी समन्वय साधून चांगले खेळायचे होते. त्यामुळे हे अवघड काम होते. पण आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला चांगले ट्रेनिंग दिले होते. तसेच आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा होता. त्यामुळे आम्ही विश्वविजेतेपद जिंकू शकलो.’’‘‘मी गेली १५ वर्षे खो खो खेळत आहे. मी राष्ट्रीय स्तरावर खेळू लागले, तसा मला घरच्यांनी देखील खूप पाठिंबा दिला. आज त्यांना माझ्यावर खूप अभिमान आहे. आई-वडिलांशिवाय हे यश मिळवू शकले नसते. आजपर्यंत मी २३ वेळा राष्ट्रीय स्तरावर आणि २ वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहे,’’असे प्रियांका म्हणाली.पुरूष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर म्हणाला, आम्ही जिंकल्यानंतर आमच्यावर खूप अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खूप आनंद होतोय. भविष्यात खो-खोला अधिक ग्लॅमर येईल. काही वर्षांपूर्वी खो खोमध्ये काहीच भविष्य नव्हते. पण आता मात्र यात चांगले करीअर होत आहे. सरकारी नोकऱ्या देखील मिळत आहेत. आमची खो खो संघटनादेखील आमच्या पाठिशी आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला खूप मदत केली आहे. इतर राज्यांपेक्षा इथे अधिक सुविधा आहेत.’’

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रKabaddiकबड्डीKho-Khoखो-खो