Pune: पांडे - राजापूर येथील पेपर मिलमध्ये पुठ्ठ्याला आग, तीन तासांत आग आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:04 IST2024-05-06T14:02:46+5:302024-05-06T14:04:31+5:30

या आगीत कंपनीला लागणारा कच्चा मालाचा पुठ्ठा जळाला....

Pandey - Paper mill fire in Rajapur, fire under control within three hours | Pune: पांडे - राजापूर येथील पेपर मिलमध्ये पुठ्ठ्याला आग, तीन तासांत आग आटोक्यात

Pune: पांडे - राजापूर येथील पेपर मिलमध्ये पुठ्ठ्याला आग, तीन तासांत आग आटोक्यात

नसरापूर (पुणे) :पुणे-सातारा महामार्ग लगत असणाऱ्या सारोळ्यापासून आतील भागात इंडो-आफ्रीका पेपर मिल कंपनीतील पुठ्ठ्याला दुपारी दोनच्या नंतर आग लागली होती. अग्निशमनच्या तीन गाड्या वेळेत उपलब्ध झाल्याने सुमारे तीन तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली ते अजून समजू शकलेले नाही.

या आगीत कंपनीला लागणारा कच्चा मालाचा पुठ्ठा जळाला. या कंपनीमध्ये कच्च्या मालापासून थोड्या अंतरावर कंपनीचा बाॅयलर आहे. कंपनी परिसरात आगीचे लोळ व धुरांचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत होते. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Pandey - Paper mill fire in Rajapur, fire under control within three hours