शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

पंचावन्न तास झाले, आरोपी पकडला का नाही? अंजली आंबेडकरांनी केले पोलिसांचा कामावर प्रश्न उपस्थित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:31 IST

संविधान आणि कायद्यानुसार आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा हलगर्जीपणाला पोलीस आयुक्त जबाबदार धरत आहेत.

पुणे -स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. शिरूर येथील ऊसाच्या शेतात तो लपल्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी तेथे ड्रोनद्वारे इमेजिंग सुरू केले आहे.दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी स्वारगेट येथील घटनास्थळाची पाहणी करून माध्यमांशी बोलतांना  महाराष्ट्राचा आणि पुण्यात महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.अंजली आंबेडकर म्हणाल्या,'महाराष्ट्रात आणि पुण्यात महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यात अत्याचार घटना वाढत आहेत. वाढत्या गुन्हेगारीस प्रशासन आणि राज्यकर्ते यांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. स्वारगेट सारख्या ठिकाणी ही घटना घडली म्हणजे अतिशय दुर्दैव आहे. परभणीत पोलिस अत्याचारमध्ये युवकाचा बळी गेला. जिथे जिथे अत्याचार होत आहेत तिथे निःपक्ष चौकशी व्हावी.आरोपी पकडला का नाही असा प्रश्न पोलिसांना विचार पाहिजे. संविधान आणि कायद्यानुसार आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा हलगर्जीपणाला पोलीस आयुक्त जबाबदार धरत आहेत. पोलीस आरोपीला काही वेळेस पाठीशी घालतात किंवा गुन्हा गंभीर आहे की नाही हे पाहतात. अशाही त्या म्हणाल्या आहे.  

त्या पुढे म्हणाल्या,'पंचावन्न तास झाले या घटनेला आरोपी अजूनपर्यंत सापडलेला नाही. आरोपीला पकडलं आहे की नाही हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे पोलिसांना विचारायला पाहिजे आणि आपण सगळे संविधान मानणारी लोकं आहोत त्यामुळे बलात्काराच्या शिक्षेला जी काही संविधानामध्ये तरतूद आहे तीच शिक्षा त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याच्यामध्ये झाली पाहिजे. हीच आमची मागणी राहील. कारण आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या पलीकडे मागण्या करत नाही आहोत.त्याचबरोबर बलात्काराची चौकशी अत्यंतपणे कठोरपणे व्हायला पाहिजे. चौकशीवेळी कुठलीही चूक व्हायला नको कारण कित्येक वेळेला केस उभी राहिल्यानंतर आरोपी सुटतात. त्याचं कारण तपासातल्यास चौकशीवेळीच्या त्रुटी असतात. त्यामुळे तपासात हे त्रुटी राहू नये याची जबाबदारी ही पोलीस खात्याची असेल. माझं संपूर्ण एसटी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की,'महाराष्ट्रातल्या सर्व ST स्थानकावरती महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनी काम करावे.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकSwargateस्वारगेटPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरCourtन्यायालयswargate bus depotस्वारगेट बसस्थानक