शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळवंडीही तापाने फणफणली

By admin | Updated: September 27, 2014 07:23 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ ते ३० संशयित रुग्णांच्या केलेल्या तपासणीत पाच जणांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळली आहेत

पिंपळवंडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ ते ३० संशयित रुग्णांच्या केलेल्या तपासणीत पाच जणांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पिंपळवंडी परिसरात गेल्या ८ ते १० दिवसांपासून थंडीताप, खोकला, हातपाय दुखण्याच्या आजारांची साथ सुरू आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ ते ३० रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यांपैकी ५ रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली असून, त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बाकीचे रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदगावे यांनी सांगितले.पिंपळवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाजरगवतही वाढले आहे. त्यातच या वर्षी खूप पाऊस झाल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. पाऊस संपल्यावर ग्रामपंचायतीने तणनाशक आणि जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे होते. परंतु, त्याबाबत कुठल्याच प्रकारची उपाययोजना केली नाही. तसेच, पिण्याच्या पाण्यात औषधही टाकले जात नाही. ग्रामपंचायत कार्यालयाकडील धुरळणी यंत्र धूळ खात पडून आहे. यंत्रसामग्री उपलब्ध असतानाही धुरळणी का केली जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अधिक माहिती घेण्यासाठी पिंपळवंडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जुन्नरचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही आपण सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगितले.(वार्ताहर)