काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:37 IST2025-04-24T13:34:47+5:302025-04-24T13:37:22+5:30
बारामती दुध संघाचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परीसरात गेले होते.

काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क
बारामती - जिल्ह्यातील सुमारे ५२० पर्यटकांनी जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती दिली आहे. हे सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांच्या माघारीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. याची माहिती राज्य सरकारसह जम्मू काश्मीर सरकार केंद्र सरकारकडे देण्यात आली आहे.
अशात बारामती दुध संघाचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परीसरात गेले होते. हे शिष्टमंडळ सुद्धा अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना लवकरात लवकर बारामतीत आणण्यासाठी गुरुवारी(दि २४) असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरीलधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली.
उमपुुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी (दि २४) छत्रपती कारखाना निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीसाठी बारामती उपस्थित होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांंनी दुध संघाच्या शिष्टमंडळाबाबत माहिती घेतली. पवार यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळाशी संपर्क साधला. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मोहोळ यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.
अजित पवार यांनी रेल्वेने परत येणाऱ्या नागरीकांनी मंत्री गिरीष महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,तर विमानाने परत येणाऱ्या नागरीकांनी विमानमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. यावेळी पवार यांनी सुचित केले. काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांसाठी मुंबईत खासगी सचिवांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली. अजित पवार यांच्या सूचनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने प्रत्येक दोन तासांनी अडकलेल्या लोकांच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत आहे.