(पान १साठी) ‘बिल्डर’ अविनाश भोसले ईडीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:11 AM2020-11-28T04:11:22+5:302020-11-28T04:11:22+5:30

पुणे : अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि. ...

(For page 1) 'Builder' Avinash Bhosale in the net of ED | (पान १साठी) ‘बिल्डर’ अविनाश भोसले ईडीच्या जाळ्यात

(पान १साठी) ‘बिल्डर’ अविनाश भोसले ईडीच्या जाळ्यात

Next

पुणे : अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि. २७) कसून चौकशी केली. पुण्यातल्या त्यांच्या बंगल्यावर दिवसभर सन्नाटा होता. ईडीच्या पथकाने भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर छापा टाकल्याचे समजते, मात्र यास दुजोरा मिळू शकला नाही.

ईडीच्या परिमंडळ दोनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भोसले यांना चौकशीसाठी मुंबईतील बँलार्ड पियर येथे असणाऱ्या कार्यालयात बोलावून घेतले. सकाळी सुमारे दहा वाजता भोसले यांची अलिशान गाडी ईडीच्या कार्यालयाबाहेर आल्याची बातमी राजकीय क्षेत्रात वेगाने पसरली. रात्री आठ वाजेपर्यंत भोसले ईडीच्या कार्यालयात होते. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. भोसले यांच्यासोबतच राज्यातील काही अन्य उद्योजकांचीही चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येते मात्र त्याची खातरजमा होऊ शकली नाही. भोसले यांची मुंबईत चौकशी चालू असताना त्यांच्या पुण्यातील निवासस्स्थानीही ईडीच्या पथकाने छापा टाकला. भोसलेंच्या बाणेर परिसरातील बंगल्यावर ही पथके पोचल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वीही झाली होती चौकशी

भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वीही फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ साली अमेरिका आणि दुबई दौरा करून भारतात येताना परकीय चलन व महागड्या वस्तू अबकारी शुल्क (कस्टम ड्यूटी) न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. तसेच जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून भोसले यांच्यासह सहा जणांच्या विरोधात २०१६ साली चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोसले यांच्यावर यापूर्वी प्राप्तिकर विभागाने छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यावेळी त्यांचे जावई आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या कार्यालयावरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती.

.............

रिक्षा चालक ते बडे बिल्डर!

पुण्यात रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या भोसले यांनी अल्पावधीत बांधकाम क्षेत्रात काम सुरु केले. त्यानंतर त्यांनी साधलेली प्रगती डोळे दिपवणारी आहे. पंचतारांकित हॉटेल्स, राज्यभरात विविध ठिकाणी मालमत्ता त्यांच्या कंपनीकडे आहेत. मात्र रिक्षावाला ते बडा बांधकाम व्यावसायिक हा त्यांच्या आर्थिक प्रगतीचा वेग नेहमीच चर्चेच्या भोवऱ्यात राहिला आहे. १९९५ मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजप सरकारच्या काळातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून भोसले यांचा ‘प्रचंड’ विकास झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: (For page 1) 'Builder' Avinash Bhosale in the net of ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.