पुण्यातील संतापजनक घटना! भिकारी महिलेवर फूटपाथवर अत्याचार; चार जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:51 IST2023-04-28T12:50:44+5:302023-04-28T12:51:01+5:30

महिला भीक मागून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात

Outrageous incident in Pune Beggar woman assaulted on footpath A case has been registered against four people | पुण्यातील संतापजनक घटना! भिकारी महिलेवर फूटपाथवर अत्याचार; चार जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील संतापजनक घटना! भिकारी महिलेवर फूटपाथवर अत्याचार; चार जणांवर गुन्हा दाखल

पुणे/किरण शिंदे : भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर फुटपाथवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 आणि 26 एप्रिल च्या रात्री हा सर्व प्रकार घडला. 30 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या भीक मागून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. फुलेनगर येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात त्या कुटुंबासह राहतात. 25 एप्रिल च्या रात्री त्या जेवण करून फुटपाथवर झोपल्या होत्या. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंखेसाठी गेल्या असताना एका आरोपीने त्यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध केले. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Outrageous incident in Pune Beggar woman assaulted on footpath A case has been registered against four people