संतापजनक घटना! अल्पवयीन मुलींना उत्तेजक इंजेक्शन देऊन दारू पाजून अत्याचार, दोन जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 20:21 IST2024-05-17T20:21:12+5:302024-05-17T20:21:44+5:30
लॉजवर नेऊन मुलींना उत्तेजक इंजेक्शन देण्यात आली, तसेच दारू पाजून अत्याचार केला

संतापजनक घटना! अल्पवयीन मुलींना उत्तेजक इंजेक्शन देऊन दारू पाजून अत्याचार, दोन जण अटकेत
राजगुरूनगर: दोन युवकांनी ओळखीच्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन उत्तेजक इंजेक्शन देऊन लॉजवर नेऊन दारू प्यायला देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आहे. दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून खेड पोलीसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना मागील महिन्यात २७, २८ एप्रिल रोजी घडली. आरोपी अजय भिकेन दौड ( वय २९ रा. सातकरस्थळ ता खेड ) श्रीराम संतोष होले, (वय २३ रा. होलेवाडी ता. खेड ) या दोन आरोपींनी ओळखीच्या अल्पवयीन मुलींना आपण फिरायला जावु असे म्हणुन शिरूर येथे नेले. तिथे आरोपी किरण (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्या कडुन उत्तेजक इंजेक्शन घेऊन पाबळ येथे डोंगरावर निर्जनस्थळी मुलींना नेण्यात आले. तिथे उत्तेजक इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. मुलींनी इंजेक्शन घेण्याचा नकार देतास धमकी देऊन हातावर इंजेक्शन देण्यात आले. पुढे खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत येथील एका लॉजवर जावुन तेथे लॉजच्या दोन रुम घेऊन आरोपी अजय दौड यांने एका अल्पवयीन मुलीला एका रूममध्ये नेले. तसेच आरोपी श्रीराम होले याने दुस-या मुलीला रूममध्ये नेले. दोघींनाही दारू पाजुन दोघांनीही जबदस्तीने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलींनी फिर्याद देताच तात्काळ खेड पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी देण्यात असून पुढील तपास खेड पोलीस करत आहे.