शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शालाबाह्य १४९0 मुले!

By admin | Updated: July 6, 2015 04:48 IST

जिल्ह्यात शनिवारी, ४ जुलै रोजी शालाबाह्य मुलांच्या केलेल्या सर्वेक्षणात १४९0 मुले आढळली. त्यात सर्वाधिक २१२ दौंड तालुक्यात व सर्वांत कमी १० वेल्हा तालुक्यात आढळली.

पुणे : जिल्ह्यात शनिवारी, ४ जुलै रोजी शालाबाह्य मुलांच्या केलेल्या सर्वेक्षणात १४९0 मुले आढळली. त्यात सर्वाधिक २१२ दौंड तालुक्यात व सर्वांत कमी १० वेल्हा तालुक्यात आढळली. १० हजार ५०० प्रगणकांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन हे सर्वेक्षण केले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी दिली.शाळेत न जाणाारी बालके ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही, असे ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालक किंवा १ महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. पल्स पोलिओच्या धर्तीवर ही मोहीम राबवून प्रत्येक सर्वेक्षित बालकाच्या बोटाला शाई लावण्यात आली. राज्यात सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे सर्वत्र एकाच दिवशी राबविले गेले. पुणे जिल्ह्यात ७ लाख ५५ हजार २५० एवढी कुटुंबसंख्या आहे. साधारण १०० घरांच्या सर्वेक्षणासाठी १ सर्वेक्षण अधिकारी नेमण्यात आला होते. १० हजार ५०० प्रगणक तथा सर्वेक्षण अधिकारी, ४९० झोनल अधिकारी व ३० नियंत्रक यांच्यामार्फत हे सर्वेक्षण केले. जिल्ह्यात १० विभाग करण्यात आले होते.यात वय वर्षे ६ पूर्र्ण झालेली. पण अद्याप शाळेत न गेलेली अशी ६२० मुले तर मध्येच शाळा सोडलेली ८४२ मुले सापडली. वीटभट्टी कामगारांची, उसाचे शेतात काम करणारे मजूर, धरणाच्या परिसरात काम करणाऱ्या टोळ््या यांच्या मुलांचे प्रमाण जास्त आढळून आले.या सर्व मुलांच्या पुढील शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या असून केंद्रप्रमुखांवर केंद्रसमन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते त्यांच्या कार्यक्षेत्रात आढळलेल्या मुलांना शाळेची गोडी लागण्यासाठी व नियमित शाळेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच वयानुरूप प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्यासाठी अभ्यासक्रम वेगळा असणार असून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. दररोज घरभेटीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)त्यांनीही केला मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्धार४या सर्वेक्षणात सर्वेक्षण अधिकारी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या भटक्या-विमुक्त कुटुंबांपर्यंत पोहोचली. याचे या कुटुंबांना नवल वाटले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शासन आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी घरापर्यंत आल्याने या कुटुंबांनीही आपल्या मुलांना शाळेत घालण्याचा निर्धार केल्याचे काही सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांचा प्रश्नया सर्वेक्षणात काही काम, व्यवसायानिमित्त काही दिवसांसाठीच स्थलांतरित असलेल्या कुटुंबांतील मुलेही आढळून आली आहेत. मात्र त्यांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याचे उपशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले. पुण्यात १,६८३ पुणे शहरात झोपडपटट्या, फुटपाथ, बस स्थानके, रेल्वे स्थानक, दगडखाणी, पूल आणि रस्त्यावर केलेल्या सर्व्हेक्षणात ६ लाख ६१ हजार ४१२ घरांचा सर्व्हेमध्ये १ हजार ६८३ मुले शाळेत आढळून आल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रमुख बी. के. दहिफळे यांनी दिली.