शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:31 IST

चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे

चाकण: महामार्गांसह परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही ढिम्म प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून या प्रश्नाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यावर लवकर काही तरी निर्णय घ्या ! कारण आमच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. असा निर्वाणीचा इशारा चाकणकरांनी दिला आहे.

स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयातवाहतूक कोंडी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अंकुश जाधव,चाकण वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक प्रकाश राठोड,एमएसईबीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे, भाग्यश्री गिरी,अशपाक आलम, प्रिया पवार, मृन्मय काळे, प्रकाश गोरे, निलेश गोरे, प्रविण गोरे, महेश शेवकरी, रोनक गोरे, विशाल नायकवाडी, किरण कौटकर, अमोल साळवे, गणेश भुजबळ, रावसाहेब नाणेकर, रंगनाथ गोरे, स्वामी कानपिळे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणच्या मुख्य महामार्गांवर मोठ्या संख्येने लहान मोठ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात अपुरे रस्ते, रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अवैध प्रवासी वाहतूक आदी समस्यांनी स्थानिक नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. याकडे वाहतूक पोलिस, चाकण नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमआयडीसी, पीएमआयआरडीए आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. यावर लवकर तोडगा काढा असा चाकणकरांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

अपुऱ्या सुविधांमुळे स्थानिकांचे बळी पडत आहे.आम्ही किती दिवस सहन करायचे?राष्ट्रीय महामार्ग म्हणता त्यावरून जनावरांना ही चालायला लाज वाटेल,अशी स्थिती त्याची झाली आहे.कधी रस्ता करणार?वाहतूक कोंडी कमी कधी करणार? आदी प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले.

वाहतूक कोंडी आणि रस्त्यांसंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सूचना सुचवण्यात आल्या आहेत.त्यावर संबंधित विभागांनी काम करून दहा ते बारा दिवसांत काम करावे. - नितीन गोरे,अध्यक्ष, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणTrafficवाहतूक कोंडीcarकारbikeबाईकPoliceपोलिसSocialसामाजिक