शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ध्येय कोरोनामुक्तीचे..! ‘कंटन्मेंट झोन’ मधील तब्बल साडेसात लाख नागरिकांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 4:35 PM

मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीतून २०० जण कोरोनाबाधित असल्याचे समोर

ठळक मुद्दे७३ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून प्रत्येकाचे होणार स्क्रिनिंग  येत्या सात दिवसात या भागातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणाररेड झोन, हॉटस्पॉटमधील दाट वस्ती व ८ प्रमुख झोपडपट्टी भागावर लक्ष केंद्रित

नीलेश राऊत- 

पुणे : कंटन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या शहरातील पाच क्षेत्रिय कार्यालय परिसरातील रेड झोनमधील सुमारे साडेसात लाख लोकांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून, आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक नागरिकांची प्रत्येकाची वैयक्तिक तपासणी करण्यात आली आहे. कंटन्मेंट झोनमध्ये एकही कोरोनाबाधित राहू नये म्हणून ' कोरोना फ्री 'चे ध्येय घेऊन पालिका प्रशासनाने हे काम हाती घेतले असून, येत्या सात दिवसात या भागातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी ' लोकमत' ला याबाबत माहिती दिली. शहरातील येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोलेरस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता या पाच क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील कंटन्मेंट झोनमधील प्रत्येकाची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. याकरिता पालिकेच्या १३ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनसह शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या ६० व्हॅनही खासगी डॉक्टरांसह या कार्यात सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून आता रेड झोन, हॉटस्पॉटमधील दाट वस्ती व ८ प्रमुख झोपडपट्टी भागावर लक्ष केंद्रित करून ट्रेसिंग व टेस्टिंगवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीतून २०० जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून, त्यांना विविध रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांना कोरोना संबंधित लक्षणे आढळून आले आहे, अशा नागरिकांना त्यांच्या घरापासून दूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये न हलविता, त्याच परिसरातील शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. परिणामी संबंधित व्यक्तीही या क्वारंटाईन होण्यास तयार होत असून, आपण घरापासून दूर नसल्याची भावनाही त्याच्यात निर्माण होत असून त्याचे आता प्रशासनाला पूर्ण सहकार्य मिळत आहे. -----------------कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्ध्यांचीच आवश्यकताशहरातील रेड झोनमध्ये सूक्ष्म तपासणीचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, याकरिता मनपा प्रशासनास मोठया प्रमाणावर कोरोना विरोधात लढणाऱ्या योध्द्यांची आवश्यकता आहे. आजमितीला स्वयंसेवी संस्थांनी यात मोठा पुढाकार घेतला असून ,यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, नर्स यांचा समावेश आहे. या कार्यात आणखी हात भार लावण्याकरिता नागरिकांनी पुढे येऊन या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन रूब्ल अगरवाल यांनी लोकमतच्या माध्यमातून केले. कोरोना योध्दा करिता नोंदणीकरण सुविधा उपलब्ध असून, याकरिता इच्छुकांनी ँ३३स्र://ूङ्म५्र२िी५ंह्यस्र४ल्लीूङ्म१स्रङ्म१ं३्रङ्मल्ल.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर नोंदणी करावी़ ----------------------------* कंटन्मेंट झोनमधील साडेसात लाख लोकांचे स्क्रनिंग होणार * सात दिवसात साडेसात लाख नागरिकांची तपासणी पूर्ण करण्याचे नियोजन* येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोलेरस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील    क्षेत्रिय कायार्लातंर्गत होणार तपासणी* ७३ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन कंटन्मेंट क्षेत्रात तपासणीसाठी कार्यरत* संशयितांना परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवणार : क्षेत्रिय कार्यालयनिहाय क्वारंटाईन सेंटर* पालिकेच्या मदतीला शहरातील स्वयंसेवी संस्थाही सरसावल्या 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका