Otur Accident : पिकपकॅरीच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:33 IST2024-11-25T19:27:36+5:302024-11-25T19:33:46+5:30
ओतूर : जुन्नर तालुक्यात नगर - कल्याण राष्ट्रीय महामार्गाजवळील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयासमोर पिकपकॅरी व मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात ...

Otur Accident : पिकपकॅरीच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
ओतूर : जुन्नर तालुक्यात नगर - कल्याण राष्ट्रीय महामार्गाजवळील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयासमोर पिकपकॅरी व मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. २५ ) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडला.
या अपघाताबाबत ओतूर पोलिसांनी सांगितले की,'नगर कल्याण महामार्गावर मोटारसायकलस्वार ओतूरवरून आळेफाट्याच्या दिशेने तर पिकपकॅरी आळेफाट्याच्या दिशेकडून ओतूरकडे जात होती. यादरम्यानं आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या जवळ दोन्ही वाहन एकमेकांना धडकली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मोटार सायकलस्वार कुणाल नानाभाऊ काळे (वय १७ वर्ष), रविंद्र सावळेराम भुतांबरे (वय २१ वर्ष)रा. आंबेगव्हाण यांना रुग्णालयात नेले.
दरम्यान, डॉक्टरांनी रविंद्र सावळेराम भुतांबरेला मृत घोषित केले. तर श्रीकांत खंडू काळे (वय १७ ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.' अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पिकपकॅरी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
यापूर्वीही अनेकदा अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर गेटच्या समोर अपघात झाले आहे स्थानिकांकडून अनेक वर्षापासून स्पीड ब्रेकरची मागणी करण्यात आली आहे परंतु शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.